अनवर्दे खुर्द विकास सोसायटीचे सचिव देविदास सोनवणे यांचा सेवानिवृत्ती सोहळा संपन्न*

 



*अनवर्दे खुर्द विकास सोसायटीचे सचिव देविदास सोनवणे यांचा सेवानिवृत्ती  सोहळा संपन्न* 

अनवर्दे खुर्द ता.चोपडा दि.०२ (प्रतिनिध) येथील विविध कार्यकारी सोसायटीचे सचिव देविदास चिंतामण सोनवणे यांचा सेवानिवृत्ती सत्कार सोहळा नुकताच पार पडला.

सत्कार सोहळ्याचे अध्यक्षस्थान जे.डी.सी.सी. बँक संचालक घनःश्यामभाई अग्रवाल यांनी भूषविले तर प्रमुख पाहुणे जि.प. सदस्या निलीमाताई पाटील, चोसाका व्हाय चेअरमन शशिकांत देवरे हे मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सोसायटी चेअरमन विजय बोरसे यांनी गावातील जे.डी.सी. सी. बँकेच्या अडिअडचणी विषयी माहिती देऊन बीएसएनएल ऐवजी जिओ मोबाईल नेट पॅकसह देण्याची मागणी करत कर्मचारी कोटा भरण्यात आल्यास बैंक शाखा प्रगतीपथावर  राहिलं असे सांगत तालुक्यात 113 पिक कर्ज घेणाऱ्या सभासदांना १८ एप्रिल पिक कर्ज पुरविणारी एकमेव सोसायटी असल्याचे सांगितले.

यावेळी अशोक देवराम पाटील (माजी सरपंच बुधगाव), तुषार साळुंखे, बुधगाव सोसा चेअरमनपदी दिवान निंबा वाघ,विचखेडा  सोसा. माजी चेअरमन अशोक जगन्नाथ धनगर, नवनिर्वाचित सदस्य चंद्रकांत पाटील, उपसरपंच अरुण पाटील,विठ्ठलदादा बोरसे, शरद संपत बोरसे,भालेराव चिमणराव बोरसे, उर्वेश साळुंखे (रा.काँ. तालुका) संदीप बोरसे,ज्ञानेश्वर(निंबा) बोरसे, सौ. मिनाबाई माधवराव शिरसाठ (व्हाय-चेअरमन) प्रल्हाद शिरसाठ,श्रीराम बोरसे, जगदिश बोरसे, प्रकाश शिरसाठ ,पंढरीनाथ बोरसे, डिगंबर धनगर , रविंद्र पारे, धूपे खूर्द चेअरमन विजय प्रल्हाद पाटील, अमोल पाटील  आदि उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक नथ्थू देवराम बोरसे यांनी केले तर

आभार भूपेंद्र पाटील यांनी मानले.



Post a Comment

थोडे नवीन जरा जुने