स्व.नेवेंच्या स्मृतीदिनानिमित्त अमर संस्थेच्या विविध उपक्रमात मिष्ठान्न भोजन
चोपडा दि.२३(प्रतिनिधी) - येथील रा.स्व.संघाचे स्वयंसेवक,जुन्या पिढीतील वृत्तपत्र वितरक शांताराम तानाजी तथा एस.टी.नेवे यांच्या आठव्या स्मृती दिनानिमित्त नानाश्री प्रतिष्ठानच्या वतीने वेले ता.चोपडा येथील अमर संस्था संचलित अनाथाश्रम,वृध्दाश्रम व मानव सेवा केंद्रात मिष्टान्न भोजन देण्यात आले.स्व.शांताराम नेवे यांच्या प्रतिमेचे पूजन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका संघचालक डॅा.मनोज साळुंखे,चोपडा कसबे सोसायटीचे चेअरमन प्रवीण गुजराथी, संघाचे तालुका कार्यवाह मनोज विसावे यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच धार्मिक विधी सागर नेवे व अॅड.किशोरी नेवे यांनी पार पाडले.यावेळी भारतीय किसान संघाचे तालुकाध्यक्ष भगवान न्हायदे,पत्रकार श्रीकांत नेवे,सूतगिरणी संचालिका रंजना नेवे,सौरभ नेवे,चौधरी सर उपस्थित होते.