जळगाव शहरात जगतज्योती म.बसवेश्र्वर यांचा अर्धाकृती पुतळ्यासाठी जागा देण्याचे महापौरांचे आश्वासन.. लिंगायत समाज बहुउद्देशीय संस्थेचे प्रथम प्रयत्न यशाकडे..!


जळगाव  शहरात जगतज्योती  म.बसवेश्र्वर यांचा अर्धाकृती पुतळ्यासाठी जागा देण्याचे महापौरांचे आश्वासन.. लिंगायत समाज बहुउद्देशीय संस्थेचे प्रथम प्रयत्न यशाकडे..!

जळगाव दि.२४ ( प्रतिनिधी) जळगाव शहरात जगतज्योती  म.बसवेश्र्वर यांचा पुतळा नसल्याने  लिंगायत समाज बहुउद्देशीय संस्थेतर्फे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली असून पुतळ्यासाठी त्वरित जागा उपलब्ध करून द्यावी अशी जोरदार मागणी महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

जळगाव  शहरात जगतज्योती  म.बसवेश्र्वर यांचा पुतळा नाही म्हणुण  लिंगायत समाजातील बहुसंख्य समाज बांधवानी  समाजाचे संस्थापक व प्रचारक यांचाअर्धपुतळा  उभारावा अशी  मागणी केली आहे  त्यावर समाजभावनेचा विचार  करुन म.न.पा. महापौर सौ.जयश्रीताई सुनिल महाजन व उप महापौर कुलभूषण पाटील यांनी त्यांना समाजाचे श्रध्दास्थान म.बसवेश्वरांचा पुतळा जळगाव  शहरात बसविणे  बाबत चर्चा केली. यावेळी  म.न.पा तर्फे वीरशैव लिंगायत समाजा साठी समाजभवन बांधणे कामी म.न.पा.ची ओपन प्लेस मिळुन समाजभवन बांधुन मिळणे बाबतही   उहापोह झाला. महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी समाज भावनेचा आदर ठेवुन उपरोक्त विषयी हिरवा कंदील दिला आहे म.बसवेश्वरांचे पुतळ्या साठी प्राधान्यक्रमाने 3 ठिकाणे सुचवा  मी  म.न.पा,तर्फे सर्वे करुन योग्य ती जागा पुतळ्यासाठी निश्चित करुन तसा ठराव करुन जागा देईल असे आश्वासन दिले .

निवेदन प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष सदीपभाऊ बसवे,संदिपभाऊ मिटकरी,समिर गुळवे, सोमनाथ पंतगपुरे,  किशोरआप्पा चोपडे ,गोंविद खांदे, ,मंकरद पाटील, मनिष आप्पा खांदे, मा.नगरसेवक दिलीपभाऊ पोकळे, गणेश चौधरी,राजू पाटील,प्रमोद वाणी, आदि कार्यकर्ते उपस्थित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने