धुळ्यात त्रिरत्न बौद्ध महासंघातर्फे भगवान बुद्ध जयंती निमित्त प्रवचन व गायनाचा कार्यक्रम उत्साहात*

 



धुळ्यात त्रिरत्न बौद्ध महासंघातर्फे भगवान बुद्ध जयंती निमित्त प्रवचन व गायनाचा कार्यक्रम उत्साहात
*

धुळे दि.१९(प्रतिनिधी)येथील त्रिरत्न बौद्ध महासंघातर्फे भगवान बुद्ध जयंती निमित्त प्रवचन व गायनाचा कार्यक्रम सोत्साहात पार पडला.

दि. १५ /०५/ 2022 रोजी सायंकाळी भगवान् बुद्ध जयंती निमित्त  कृषीनगर येथे धम्म प्रचारक मैत्रेसागर नागपूर यांचे सुश्राव्य प्रवचन झाले .त्यांनी बुद्ध पौर्णिमेचे महत्व विशद केले. 

नंतर महाकवि, गायक वामनदादा कर्डक त्यांच्या स्मृती दिना निमित्त रामचंद्र गांगुर्डे व दिपमाला देवरे याचा भिमगीतांचा बहरदार कार्यक्रम संपन्न झाला अली सभ्यद या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाहिद अली सय्यद अली यांनी केले

या कार्यक्रमाला अण्णासाहेब जी. डी.जाधव धम्ममित्र संजय चव्हाण, धम्ममित्र सुभाष जाधव, राहुल वाघ, सिद्धार्थ जाधव गोकुळ भामरे, बुद्धभूषण चव्हाण यांनी परिश्रम  घेतले. कार्यक्रमास कृषीनगर येथील भगिनी व नागरिक मोठ्या प्रमाणावर - उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने