खेड तालुक्यातील किल्लेमाची गावी श्री गोसावी महाराज मंदिर वर्धापन दिन सोहळा कार्यक्रम*




 *खेड तालुक्यातील किल्लेमाची गावी श्री गोसावी महाराज मंदिर वर्धापन दिन सोहळा कार्यक्रम*

खेड,दि.१२(प्रतिनिधी अक्षय कदम )रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील मु.किल्लेमाची पो.घेरापालगड गावी श्री गोसावी महाराज मंदिर वर्धापन सोहळ्याचे सोमवार  दि.१६ मे २०२२ रोजी आयोजन करण्यात आले आहे.तसेच श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली आहे.कार्यक्रमाची रुपरेषा पुढीलप्रमाणे सकाळी ७ ते ९ वाजता प्राणप्रतिष्ठा,सकाळी ९ ते १०.३० वाजता होमहवन,सकाळी १०.३० वाजता सत्यनारायणाची महापूजा व आरती,दुपारी १२.३० वाजता महाप्रसाद (भंडारा), सायंकाळी ६ वाजता हरिपाठ किल्लेमाची ग्रामस्थ मंडळ,रात्री ७ ते ९ वाजता मान्यवरांचे स्वागत, रात्री ७ ते ९ वाजता पाटण तालुक्यातील पहिली बाळ कीर्तनकार कु.ह.भ.प ज्ञानेश्वरी ताई पुजारे पाटणकर हिचे कीर्तन,रात्री ११ वाजता श्री.ह.भ.प संतोष महाराज पुजारे यांचे संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेले सुप्रसिद्ध एकपात्री भारुड असे कार्यक्रम होणार आहेत.श्री.योगेश (दादा) कदम (आमदार-दापोली,खेड,मंडणगड मतदार संघ),श्री.चंद्रकांत(अण्णा) कदम (जिल्हा परिषद मा. बांधकाम सभापती रत्नागिरी), श्री.नितीन शेठ विचारे(उद्योजक मुंबई),श्री.सखाराम धोंडू कदम (सामाजिक कार्यकर्ते) वरील प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत.तरी आपण सर्वांनी सहपरिवारसह उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी यासाठी आपणांस आग्रहाचे मनःपूर्वक निमंत्रण.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने