वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त विसापूर येथे रक्तदान शिबिर संपन्न



वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त विसापूर  येथे रक्तदान शिबिर संपन्न



विसापूर दि.१२(प्रथमेश तेलंग): सध्या जिल्ह्यात रक्तांच्या साठा पुरेसा उपलब्ध नसल्याने जिल्ह्यात सगळीकडे रक्ताची टंचाई झाली आहे ही बाब लक्षात घेत विसापूर येथील बहुजन  हृदयसम्राट, वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र विसापूर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन महापुरुषच्या प्रतिमेस माल्यार्पण करून वंचित बहुजन आघाडी चे जेष्ठ नेते दादाजी जीवने, लोकचंदजी भोयर यांच्या हस्ते करण्यात आले. अनेक युवक, युवती रक्तदान करून मोलाचे सहकार्य केले. बल्लारपूर महावितरणचे कार्यकारी अभियंता ठावरे सर यांनी रक्तदान शिबिरात प्रत्यक्ष येऊन भेट दिली व रक्तदात्यांना प्रोत्साहन दिले. शिबिराचे आयोजन भीमशक्ती युवा ग्रुप व वंचित बहुजन युवा आघाडी यांनी केले व विशेष सहकार्य प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कांचन आकरे सर व त्यांच्या संपूर्ण सहकार्‍यांचे विशेष सहकार्य लाभले सोबतच अल्पोपहाराची व्यवस्था सुद्धा प्राथमिक आरोग्य केंद्र द्वारे करण्यात आली. रक्तसंकलन विभागाचे  आयोजकने आभार मानले. प्रामुख्याने उपस्थिती भीमशक्ती युवा ग्रुप चे अध्यक्ष स्वप्निल सोनटक्के, वंचित युवा आघाडीचे सिद्धांत पुणेकर, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.कांचन आकरे सर, गुंजन वानखेडे, नीलजय गावंडे, प्रदीप पांझारे, राहुल वनकर, सुरज खोबरागडे, नीताताई मिलमिले सिद्धार्थ चूनारकर, साक्षी टोंगे, आशिष तितरे, विजय पांझारे, मोहन मिलमिले, शंकर जुनघरे,  सुमित तलसे, भूषण दुर्योधन, सोहम जीवने, गुलाब पुणेकर, सुभाष परसुटकर, अक्षय पुणेकर, महेश तुरानकर, संजय वानखेडे, कुणाल लोखंडे, राजू सातपुते, संदीप पुणेकर, व इतर कार्यकर्त्यांचे कार्यक्रमास सहकार्य लाभले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने