अडावद येथे नाला खोलीकरणास प्रारंभ

 




अडावद येथे नाला खोलीकरणास प्रारंभ

अडावद ता. चोपडा दि.३१(प्रतिनिधी):

      येथे पाणीटंचाईला तोंड देण्यासाठी जमिनीत जलसाठा वाढवा म्हणून लोकसहभागातून नालाखोलीकरणास प्रारंभ झाला. यावेळी आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे यांचेसह जळगावचे महापौर जयश्रीताई महाजन यांच्या उपस्थित कार्यक्रम संपन्न झाला.

       २९ रोजी संध्याकाळी ५ वाजता स्टेट बँकेच्या मागील नाल्यात जेसीबी लावून नालाखोलीकरणास प्रारंभ झाला. यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे तर उदघाटक म्हणून  महापौर जयश्री महाजन, या होत्या. यावेळी   सरपंच भावनाताई पंढरीनाथ माळी, उपसरपंच जावेदखा पठाण, ग्रामपंचायत सदस्या भारतीताई सचिन महाजन, सविताताई रामकृष्ण महाजन, ज्ञानेश्वर भोई, जितेंद्रकुमार शिंपी, पुरुषोत्तम महाजन, गुलाबराव पाटील,  रामकृष्ण महाजन , वडगावचे उपसरपंच नामदेव पाटील, विलास पाटील,  लोणी उपसरपंच नाना पाटील, पंचकचे प्रवीण सोनवणे, विनोद सोये, मंगल इंगळे, रियाजअली सैय्यद, अमोल पाटील, एम जी पाटील, बी के साळुंखे , नरेंद्र पाटील, धोंडू कोळी, सचिन महाजन, पि. आर. माळी आदींसह कार्यकर्ते, ग्रामस्थ, पंचक्रोशीतील पदाधिकारी उपस्थित होते.

  ..........................................................

   भविष्यात पाणीटंचाई भासणार नाही

    चोपडा विधानसभा मतदार संघात अनेक ठिकाणी नालाखोलीकरण, बंधारे बांधकाम, जुन्या बंधाऱ्यांचे नुतनीकरण अशी कामी हाती घेतले आहे. यामुळे पाण्याच्या पातळीत वाढ होऊन नक्कीच भविष्यात पाणीटंचाई दूर होईल.

      आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे

..............................................................






Post a Comment

थोडे नवीन जरा जुने