राज्य शासनाच्या विरोधात पेट्रोल डिझेल भाव कमी करण्यासाठी युवा मोर्चा भाजपा तर्फे तहसीलदारांना निवेदन
*चोपडा दि.२५(प्रतिनिधी )* :चोपडा भाजपा युवा मोर्चा तर्फे उग्र एल्गार आंदोलन करुन महाराष्ट्र शासनाने पेट्रोल डिझेल दरवाढ कमी करण्याचे निवेदन तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदार अनिल गावित यांना देण्यात आले.
देशातील केंद्र सरकारने (नरेंद्र मोदी सरकारने) देशभरात पेट्रोल व डिझेल चे दर कमी केले असता सर्व राज्य सरकारांनी त्याचा सन्मान करत पेट्रोल व डिझेलचे दर कमी केले. मात्र महाराष्ट्रतील महाविकास आघाडी सरकारने पेट्रोल डिझेल चे दर कमी न करता फक्त घोषणा करीत महाराष्ट्र राज्यातील जनतेची दिशाभूल केल्याच्या निषेध व्यक्त करत कमी कमी 8/10 रुपये पेट्रोल व डिझेल चे भाव कमी करावेत अशी मागणी निवेदनातून केली आहे
यावेळी पंकज पाटील तालुकाध्यक्ष गजेंद्र जैसवाल, शहराध्यक्ष नरेंद्र पाटील, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस प्रकाश पाटील ,युवा मोर्चा अध्यक्ष तुषार पाठक युवा, मोर्चा जिल्हा सदस्य मनोहर बडगुजर ,भाजपा सरचिटणीस भरत सोनगिरे, तालुका संयोजक रणछोड पाटील, युवा मोर्चा उपाध्यक्ष विशाल भोई ,युवा मोर्चा सरचिटणीस अमित दादा तडवी, हेमंत देवरे, युवा मोर्चा सोशल मीडिया सहसयोजक अमोल नेवे, युवा मोर्चा अजय भोई ज्ञानेश्वर भोई यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.