खान्देश पुनर्विवाह गृप मार्फत एका बाळाला मिळाली आई.. पुन्हा सनई चौघडाने परिसर दुमदुमला..!

 


खान्देश पुनर्विवाह गृप मार्फत एका बाळाला  मिळाली आई.. पुन्हा सनई चौघडाने परिसर दुमदुमला..!

चोपडा दि.२४(प्रतिनिधी): विस्कटलेल्या संसाराच्या वेलीवर आपल्या समाज कार्याच्या प्रेमाची शिंपडे उडवत  संसाराची वेल पुन्हा हिरवीगार करणाऱ्या भास्कर राव पाटील यांच्या अथक प्रयत्नाने खान्देश पुनर्विवाह गृप मार्फत एका बाळाला आई मिळाल्याचा अनोखा प्रसंग चाळीसगाव येथे घडला आहे.कुटूंबाला आधार संगीनी मिळाल्याने पुन्हा सनई चौघडा वाजून "बहारो फुल बरसाओं मेरे मेहबूबा आई है" चां निनाद मंडपात गुंजल्याने परिसरात आनंदाची लहर उसळली आहे.

याबाबत प्राप्त माहिती थोडक्यात अशी,श्री अरविंद गोविंदराव पाटील यांची  सुन कोरोना मध्ये मयत झाल्या नंतर तिला दहा वर्षाचा मुलगा आहे, त्या नातवाचा सांभाळ वयस्कर आजी बाबांनाच   करावा लागायचा.त्यातच बाळाचा बाप पत्नी वारल्याने टेंशन मध्ये असायचा. अशातच  सामाजिक कार्यकर्ते श्री भास्करराव नानाजी पाटील यांच्याशी संपर्क साधला.आणि त्यांनी त्यांच्या   गृप मध्ये सामावू घेतले त्यांच्या प्रयनाने दोन महिन्यातच अमितचा विवाह जमवला.   मुलगा *अमीत**कै रमेश वानखेडे धूळे*  यांची मुलगी *रुपाली* यांचा विवाह दि. 22/05/20220 रोजी चाळीसगाव येथे मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.  श्री भास्कर राव पाटील यांच्या  समाज कार्याची दखल घेत प्रा डॉ विद्या राजेंद्र पाटील (प्राध्यापक जयहिंद कॉलेज धुळे) यांनी     बापूसाहेब भास्करराव पाटील यांचे कार्य अतिशय मोलाचे असून त्यांच्या या कार्याची समाजास नितांत गरज असल्याची भावना व्यक्त केल्या. याप्रसंगी डॉ बी आर पाटील घोडगावकर, संचालक महात्मा गांधी कॉलेज चोपडा, श्री प्रकाश ढोमण पाटील पोलीस निरीक्षक, श्री विश्वासराव सुर्यवंशी मा. संचालक ग.स. सोसायटी जळगांव, श्री . डी के पाटील, सर पातोंडा, श्री विजय शालीकराव पाटील कृषी भुषण पुरस्कार प्राप्त यांनी उपस्थिती देवून  श्री बापू सो भास्करराव नानाजी पाटील( माजी अधीक्षक जि. प. जळगांव) यांचेवर उभयतांच्या संसाराची गाठ घडवून आणल्या बद्दल अभिनंदनाचा वर्षाव केला

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने