लताताई सैंदाणे यांना एक हात मदतीचा महाराष्ट्र नाभिक महामंडळ सदैव पुढे
त-हाडी,ता.*शिरपूर( प्रतिनिधी ज्ञानेश्वर सैंदाणे ):**धुळे शहरातील मोची वाड्यात स्थायिक असलेल्या लताताई मल्हाराव सैदाणे या गरीब महिलेचा काही दिवसापूर्वी अपघात झाला होता या अपघाताततुन सावरून त्या आज घरी आल्या आहेत घरातील हलाखीची परिस्थिती असल्यामुळे अशा परिस्थितीत त्या आई-वडिलांना सांभाळत आहे त्यांना दोन मुली आहेत त्या मुलींचे लग्न झाले आहे मुलगा नाही म्हणून घरातील परिस्थितीची जाण ठेवून महाराष्ट्र नाभिक महामंडळाने लताताईंना दोन-तीन महिने पुरेल एवढा किराणा देऊन एक मदतीचा हात पुढे केला आहे त्यांच्या अपघाता समयी दवाखान्यातील खर्चासाठी महाराष्ट्र नाभिक महामंडळाने सहकार्य केले आहे या कामी काही दानशुर दात्याचा ही हातभार लागला आहे म्हणून एक पाऊल पुढे महाराष्ट्र नाभिक महामंडळ जिल्हा या परिवाराला मदत केल्याबद्दल लताताई सैंदाणे यांनी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे आभार मानले आहेत असेच सत्कार्य आपल्या हातून होत राहो अशी भावना लताताई सैदाणे यांनी व्यक्त केली आहे यावेळी महाराष्ट्र नाभिक महामंडळ धुळे जिल्हा अध्यक्ष भिमराव वारुडे माजी आयकर अधिकारी नरेद्रजी खोडे साहेब युवक महामंडळ धुळे जिल्हा अध्यक्ष दादासाहेब जितेंद्रजी बोरसे उपाध्यक्ष लक्ष्मणभाऊ बोरसे जिल्हा सचिव बी के सूर्यवंशी धुळे जिल्हा कर्मचारी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष भरतभाऊ शिरसाठ धुळे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख आण्णासो विशाल चित्ते जिल्हा संघटक धनराजभाऊ पगारे मोगलाई विभाग प्रमुख तात्यासो प्रविणजी सैंदाणे समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक छोटु पुंडलिक सैदाणे देवपूर दुकानदार संघटना अध्यक्ष विलासभाऊ सूर्यवंशी सामाजिक कार्यकर्ते दादासो सुरजजी चौधरी इत्यादी उपस्थित होते