भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अमरजी बोऱ्हाडे यांचे भाजपा जळगाव जिल्हा महानगर अनुसूचित जमाती मोर्चा तर्फे स्वागत

 

भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अमरजी बोऱ्हाडे यांचे भाजपा जळगाव जिल्हा महानगर अनुसूचित जमाती मोर्चा तर्फे स्वागत


जळगाव दि.१८(प्रतिनिधी): भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष मा. अमर बोऱ्हाडे  जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले असता वसंत स्मृती भाजपा जिल्हा कार्यालय येथे भाजपा जळगाव जिल्हा महानगर व अनुसूचित जमाती मोर्चातर्फे स्वागत व सत्कार करण्यात आले.

यावेळी उपाध्यक्ष अमरजी बोऱ्हाडे यांनी केंद्र सरकारच्या विविध २४ योजनांविषयी माहिती दिली. तसेच भारतीय जनता पार्टी हे स्वतःच्या आईप्रमाणे कार्यकर्त्यांना जपणारा पक्ष आहे. तसेच यावेळी अमरजी बोराडे यांनी सत्कार कार्यक्रमांमध्ये जळगाव जिल्ह्यासह महानगरातील अनुसूचित जाती जमातीच्या बांधवांनी भारतीय जनता पार्टी सोबत राहून संविधान व लोकशाही टिकवण्यासाठी व आपल्याला कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी जास्त संख्येने भारतीय जनता पार्टीच्या मागे उभं राहावं असं यावेळी मनोगत व्यक्त केले.

अनुसूचित जमाती मोर्चा महानगर जिल्हाध्यक्ष प्रल्हाद सोनवणे यांनी मा. अमरजी बोऱ्हाडे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. या कार्यक्रमात ऑटोरिक्षा स्कूल आघाडी अध्यक्ष प्रमोद वाणी, हॉकर्स आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर तायडे, अनुसूचित जाती मोर्चा सरचिटणीस शालूताई जाधव, कार्यालय मंत्री प्रकाश पंडित, गणेश माळी,जिल्हा संवादक योगेश पाटील, जयंत चव्हाण, सुनील जाधव, प्रकाश बनसोडे यांच्यासह अनुसूचित जाती जमातीचे पदाधिकारी व भारत भाजपा महानगराचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



Post a Comment

थोडे नवीन जरा जुने