अलका दत्तात्रय तुळसे "झाशीची राणी "पुरस्काराने सन्मानित

 अलका दत्तात्रय तुळसे "झाशीची राणी "पुरस्काराने सन्मानित 



मुंबई दि.२० (शांताराम गुडेकर ):कलाकृती मल्टीपर्पज फॉउंडेशन आणि ऊर्जा प्रतिष्ठान प्रकाशालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र मध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा नुकताच "झाशीची राणी "पुरस्कार देऊन अण्णाभाऊ साठे सभागृह, सातारा रोड, पुणे येथे सन्मान करण्यात आला.यावेळी मुंबई विभाग मधून अलका दत्तात्रय तुळसे(संपादिका /पत्रकार ) यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन प्रसिद्ध वास्तूतज्ञ श्री. आनंद पिपंळकर यांच्या शुभहस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.यावेळी कलाकृती मल्टीपर्पज फॉउंडेशन आणि ऊर्जा प्रतिष्ठान प्रकाशालय पुणे यांचे पदाधिकारी, सदस्य आणि सभासद, हितचिंतक मोठया संख्येने उपस्थित होते.अलका तुळसे यांना हा मानाचा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांना सामाजिक, राजकीय, पत्रकारिता, कला, क्रीडा, वैद्यकीय, शैक्षणिक विभागातील अनेक मान्यवर यांनी अभिनंदनसह शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने