सहाय्यक आयुक्त पदावरून डॅा.संजय गुजराथी सेवानिवृत्त

 




सहाय्यक आयुक्त पदावरून डॅा.संजय गुजराथी सेवानिवृत्त

चोपडा दि.०३(प्रतिनिधी)- येथील रहिवासी आणि पशुसंवर्धन विभागातील चोपडा विभागाचे सहाय्यक आयुक्त डॅा.संजय रमणलाल गुजराथी हे नुकतेच ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले.त्यांना त्या निमित्ताने महाराष्ट्र दिनी डॅा.हेडगेवार चौकात माजी विधानसभाध्यक्ष प्रा.अरुणभाई गुजराथी यांच्या अध्यक्षतेखाली दिमाखदार समारंभात निरोप देण्यात आला.

डॅा.संजय गुजराथी यांनी चोपडा तालुक्यासह आजुबाजुच्या परिसरात अत्यंत कामसू व सेवाभावी पशू वैद्यकिय अधिकारी म्हणून काम पाहिले.त्यांचा सपत्निक सत्कार नागपूर येथील एम.एफ.एस.यू.चे संचालक डॅा.अनिल भिकाने यांनी केला.यावेळी मंचावर डॅा.गुजराथी यांच्या पत्नी सौ.भावना गुजराथी, आई निर्मला गुजराथी, मामा विजय गुजराथी उपस्थित होते.

डॅा.गुजराथी यांनी चोपडा तालुक्यात काळजीपुर्वक पशुसेवा करतांना झोकून देवून काम केल्याने लोकप्रिय ठरले असून पशुसेवेसाठी सेवानिवृत्ती नंतरही झटण्याचा त्यांचा मानस कौतुकास्पद असून पशु वैद्यकिय क्षेत्रात संशोधन करत पुस्तक तयार करणार असल्याच्या निर्णयाचे कौतुक डॅा.अनिल भिकाने,प्रा.अरुणभाई गुजराथी यांनी केले.कार्यक्रमात पाहुण्यांचा परिचय संध्या शहा यांनी करुन दिला.तर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संजय बारी यांनी केले.डॅा.गुजराथी यांचा यावेळी अनेकांनी यथोचित सत्कार केला.याप्रसंगी माजी नगराध्यक्ष रमणलाल गुजराथी,जेष्ठ धन्वंतरी डॅा.विकास हरताळकर,अॅड.रवींद्र जैन,चोपडे शिक्षण मंडळाच्या सचिव माधुरी मयूर,पंकज समुहाचे अध्यक्ष डॅा.सुरेश बोरोले, चोसाकाचे माजी चेअरमन अॅड.घनःश्याम पाटील,कृउबाचे माजी सभापती गिरिष पाटील,उपनगराध्यक्ष भुपेंद्र गुजराथी यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, पशुसंवर्धन विभागाचे जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

कार्यक्रम यशस्वितेसाठी प्रवीण गुजराथी, ज्योतीकुमार गुजराथी, सुनिल गुजराथी, मनिष पारिख,स्वरूप गुजराथी आदिनी प्रयत्न केले.आभार अर्चना गुजराथी यांनी मानले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने