*नारोद गावी शेतकऱ्यांच्या खड्याला आग..गोदामासह शेत गडींचे संसारोपयोगी सामान जळून खाक.. ताबडतोब नुकसानभरपाई द्यावी गावकऱ्यांची मागणी*
चोपडा दि.२०(प्रतिनिधी यज्ञेश पाटील)
चोपडा तालुक्यातील नारोद गावी शेतकऱ्यांच्या खड्यात असलेल्या गोदामाला अचानक लागलेल्या आगीत शेतीपयोगी वस्तूसह तीन काम गडींचे संसारोपयोगी वस्तू जळून भस्मसात झाल्याने प्रचंड नुकसान झाल्याची घटना घडली.आग विझविण्यासाठी गावकऱ्यांसह अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न केले.सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली झाली नसून घटनेचा पंचनामा तलाठ्यांनी केला असून नुकसानभरपाई ताबडतोब मिळावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली.
याबाबत प्राप्त माहिती अशी,चोपडा तालुक्यातील नारोद गावांत महारू नथ्थू पाटील यांच्या खड्यात आग लागल्यामूळे गोदामाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे व त्याचा शेतात काम करणारे मजूर शाताराम बारेला व तोतारम बारेला व रामलाल बारेला यांचे धान्यं व त्यांचे कपडे पूर्ण पणे जळून खाक झाले आहे व महारू नथ्थू पाटील यांचेही खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे व तलाठी मॅडम यांनी येउन पहाणी करून पंचनामा केला आहे महारू नथ्थू पाटील व शाताराम बारेला व तोताराम बारेला व रामलाल बारेला यांनी नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी तलाटी मॅडमांजवळ केली आहे
सदरील आग विझविण्यासाठी राजु पाटील, प्रमोद न्हावी, गणेश पाटील , संजय पाटील यांनी यांच्यासह शर्थीचे प्रयत्न केले.