शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयात उष्माघात कक्ष सुरू करा... भाजपा विद्यार्थी मोर्चा जिल्हाध्यक्ष सुरज देसले यांची मागणी

 


शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयात  उष्माघात कक्ष सुरू करा... भाजपा विद्यार्थी मोर्चा  जिल्हाध्यक्ष सुरज देसले यांची मागणी


शिंदखेडादि.२० ( प्रतिनिधी)*शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयात उष्माघात कक्ष सुरू करावा अशी मागणी मा.नगरसेवक तथा भाजपा विद्यार्थी मोर्चा  जिल्हाध्यक्ष सुरज देसले यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे. 

         गेल्या काही दिवसांपासून तापमानात सतत वाढ होत असून तापमान 42 ते 43 अंशावर पोहचले आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी डॉक्टरांनी सूचना देखील दिल्या आहेत.  तापमानाचा पारा 43 अंशावर जाऊन ठेपला आहे त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. त्यामुळे शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयात उष्माघात कक्ष सुरू करून शिंदखेडा शहरातील व ग्रामीण  भागातील रुग्णांना सोय होईल. म्हणूनच शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयात उष्माघात कक्ष सुरू करा अशी मागणी मा.नगरसेवक तथा भाजपा विद्यार्थी मोर्चा जिल्हाध्यक्ष सुरज देसले यांनी केली आहे .

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने