महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षा उत्साहात संपन्न
चोपडा दि.25 (प्रतिनिधी) :-- महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षा दरवर्षी इयत्ता दुसरी , इयत्ता तिसरी, इयत्ता चौथी, इयत्ता सहावी व इयत्ता सातवी वर्गांसाठी आयोजित केली जाते. सदर परीक्षा मराठी , सेमी इंग्रजी व इंग्रजी तिन्ही माध्यमाच्या विद्यार्थ्यासाठी आयोजित केली जाते. मागील वर्षी कोविड काळात सदर परीक्षा ऑनलाईन पदधतीने घेण्यात आली होती. मात्र यावर्षी बालमोहन विद्यालयात ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात आली. इयत्ता दुसरी ते सातवीच्या एकूण ४३९ विद्यार्थ्यानी परीक्षा दिली. सदर परीक्षेच्या बैठकीचे नियोजन एकूण १८ ब्लॉक मध्ये करण्यात आले होते. एका बेंचवर एक विदयार्थी या प्रमाणे एका ब्लॉक मध्ये एकूण २५ विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली होती.
केंद्र संचालक म्हणून जळगाव येथील विवेकानंद प्रतिष्ठानचे उमेश रामहरी इंगळे यांनी काम पाहिले तर तालुका समन्वयक म्हणून पंकज प्राथमिक विद्यालयाचे आर डी पाटील यांनी काम पाहिले. त्यांना सागर जाधव , बाळासाहेब पाटील , ज्ञानेश्वर मिस्त्री यांचे सहकार्य लाभले.
सदर परीक्षेच्या पर्यवेक्षणसाठी प्रताप विद्या मंदिर शिक्षणशास्त्र विद्यालयाचे प्राचार्य किरण पाटील व प्रा. संजय एस देशमुख यांनी अध्यापक विद्यार्थी उपलब्ध करून दिले.
परीक्षेचे पर्यवेक्षण प्रियंका गुलाब कोळी , रविता बारेला , लक्ष्मी पावरा , आरूशा पावरा , सुष्मिता पावरा ,मेघा पावरा ,प्रज्ञा चौधरी, मोनिका सरवने ,नेहा वाघ, देवेंद्र वानखेडे, वर्षा धनगर, जयश्री कोळी , राज बारेला, नेहा अहिरे, भाग्यश्री धनगर, लालचंद बारेला, हर्षाली पाटील ,आकांक्षा पाटील आदींनी पर्यवेक्षण केले.
परीक्षेसाठी इमारत संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत अण्णा पाटील व मुख्याध्यापक प्रदिप चौधरी यांनी उपलब्ध करून दिल्याबद्दल एम टी एस परीक्षा आयोजकांनी आभार मानले आहेत....