*चोपडा औद्योगिक वसाहत निवडणुकीतील सहकार पॅनल प्रमुख महेंद्र सोनार यांच्या निस्पृह कामामुळे त्यांच्याच गळ्यातच पडली चेअरमनपदी माळ तर व्हा. चेअरमनपदी नगरसेवक रमेश शिंदे यांची वर्णी*
चोपडादि.२४(प्रतिनिधी) : येथील चोपडा तालुका ग्रामीण औद्योगिक सहकारी वसाहतीच्या चेअरमन पदावर महेंद्रभाई उर्फ (पप्पू) शेठ देवीदास सोनार यांची तर नगरसेवक रमेश ग्यानोबा शिंदे यांची व्हा. चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून के. व्ही. पाटील यांनी काम पाहिले.
नुकत्याच झालेल्या चोपडा ग्रामीण औद्योगिक वसाहत च्या निवडणुकीत महेंद्र सोनार यांनी सहकार पॅनलच्या माध्यमातून मुहूर्तमेढ करत १३च्या १३जागा पटकावून चोपड्यात एक नवीन अध्याय लिहिला. पुन्हा विजयी सदस्यांनी त्यांच्याच नावाला अग्रक्रम देत अध्यक्ष पदांची माळ त्यांच्या गळ्यात टाकून त्यांच्या वरील विश्वासाची गाठ पक्की केली आहे.शिवाय तळागाळातील लोकांपर्यंत पोहचलेल्या उद्यमी कार्यकर्ता म्हणून ख्याती असलेल्या रमेश शिंदे यांच्या नावाला नंबर दोनची पसंती देत उपाध्यक्षपदी वर्णी लावली आहे.दोघांची निवड अविरोध झाल्याने त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला आहे.
याप्रसंगी नवनिर्वाचित संचालक जितेंद्र अग्रवाल, वामनराव चौधरी, लक्ष्मण पाटील, नरेंद्र पाटील, नरेंद्र बडगुजर, नितिन काबरा, पंडित धनगर, जीवन चौधरी, खुशबू जैस्वाल, नितू अग्रवाल, भारती पाठक आदी उपस्थित होते. नूतन पदाधिकाऱ्यांचे अनेकांनी अभिनंदन केले आहे.