विचखेडा विविध कार्यकारी सोसायटी निवडणूक बिनविरोध*
विचखेडा,ता.चोपडा दि.३०(प्रतिनिधी चंद्रकांत पाटील): विचखेडा विविध कार्यकारी सहकारी सोसायटी पंचवार्षिक निवडणुकीत 13 जागेसाठी 13 उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने निवडणूक बिनविरोध झाली आहे.
सोसायटीचे बिनविरोध कर्जदार संचालक सुधाकर जगन्नाथ धनगर, चंद्रकांत गुलाबराव पाटील, अशोक गिरधर पाटिल नवल काळू धनगर, बाळू सुकलाल कुंभार, राजेंद्र रत्तू धनगर, आजोबा शंकर शिरसाठ, भास्कर अर्जुन पाटील, विमुक्त न भटक्या जाती गटातून अशोक जगनाथ धनगर, इतर मागास प्रवर्गातून माणिक पंडीतराव पाटील , महिला राखीव गटातून खटाबाई रमेश पाटील, सुमनबाई बळवंत धनगर, अनुःजाती जमाती गटातुन प्रकाश साहेबराव शिरसाठ हे बिनविरोध झाले. या निवडणूक कामी निवडणूक निर्णय अधिकारी पि. बी विसपुते सचिव राजु बोरसे यांनी काम पाहिले