*रानावनाशी सलगी असलेल्या आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी आर्थीक स्त्रोत म्हणून "मोह"ची मदिरा पाडण्याचे परवाने द्या.. आदिवासी समाज सेवक संजीव शिरसाठ यांची मागणी*
चोपडा दि.२६(प्रतिनिधी):* शासनाने नुकताच किरकोळ दुकानदारांना बाजारात बिअर विकण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे मात्र दऱ्याखोऱ्यात, जंगल वाड्या पाड्यात राहणाऱ्या आदिवासींना मात्र 'ना घरकाम ना घाटका' असे करून ठेवले आहे.योजना आहेत त्याही नावालाच.. त्यांच्या पर्यंत पोहोचतच नाही अशी अवस्था.जंगल व कष्ट पाचवीला पूजलेलं..मग दरिद्री जीवनातून बाहेर पळावं तरी कसे हा यक्ष प्रश्न सदासर्वदा त्यांच्या डोळ्यापुढे असतो. तरी शासनाने गांभीर्याने लक्ष घालून सातपुडा पर्वत रांगेत जीवन व्यतीत करणाऱ्या आदिवासी बांधवांना 'मोहु 'च्या फुलांपासून दारु पाडण्याचे परवाने द्यावेत अशी जोरदार मागणी आदिवासी समाज सेवक संजीव शिरसाठ यांनी केली आहे.शिवाय पीएम किसान योजनेत सरसकट आदिवासींच्या नावांचा समावेश करावा असे तहसीलदार चोपडा यांना देण्यात आले आहे.
आज दिनांक २६/०४/२०२२ रोजी मा. तहसिलदार अनिल गावित साहेब यांना संजीव शिरसाठ यांचे मार्गदर्शनाखाली निवेदन सादर करण्यात आले.त्यात सातपुड्याच्या रांगेतील आदिवासी वनदावेरांना पात्र अपात्र प्रलंबित यांना पी एम किसान योजनेचा लाभ मिळावा, व सामाविष्ट करावेत, तसेच पात्र अपात्र प्रलंबित वनदावेदारांना किसान क्रेडिट कार्ड मिळावे,आदिवासी बांधवांना पोटभरण्याच साधन म्हणून "मोहु" ची आर्येवेदिक नैसर्गिक दारु पाडण्यासाठी परवानगी मिळावी आदी मागण्या मांडण्यात आल्या आहेत.
निवेदन देतेप्रसंगी संजीव शिरसाठ,बिराम बारेला,बियानु पावरा, गणदास बारेला,संजय बारेला,तुकाराम बारेला,नामसिंग पावरा,मालसिंग बारेला,ईडा बारेला,हासु पावरा,बालसिंग बारेला, दिनेश बारेला, सखाराम बारेला, मधुकर भिल, गुडा पावरा आदी आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.