दिव्यांगांची ५०% घरपट्टी माफ करा.. व्यापारी संकुलातील गाळे द्या.. जिल्हाधिकारी व मुख्याधिकाऱ्यांकडे दिव्यांग सेनेचे मागणी*



दिव्यांगांची ५०% घरपट्टी माफ करा.. व्यापारी संकुलातील गाळे द्या.. जिल्हाधिकारी व मुख्याधिकाऱ्यांकडे  दिव्यांग सेनेचे मागणी*

जळगाव दि.२८(प्रतिनिधी) जळगाव जिल्हा दिव्यांग सेनेमार्फत दिव्यांच्या विविध समस्यांचे निवेदन उप जिल्हाधिकारी  आणि मुख्यकार्यकारी अधिकारी  जि.प.जळगाव यांना देण्यात आले.

उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे जळगाव आणि मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया (भा.प्र.से) जिल्हा परिषद जळगाव यांना दिव्यांग सेना जिल्हा अध्यक्ष अक्षय महाजन, दिव्यांग सेना जिल्हा सल्लगार राहुल कोल्हे, यावल तालुका अध्यक्ष मुन्ना उर्फ योगेश चौधरी, तालुका उपाध्यक्ष अशोक कोळी, तालूका सचिव चेतन तळेले, सहसचिव राजू सोनवणे यांनी विविध मागण्यासाठी निवेदन दिले त्यावेळी उपजिल्हाधिकारी मॅडम आणि मुख्यकार्यकारी अधिकारी साहेब जिप जळगाव यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
  जळगाव जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत हद्दीतील  दिव्यांग बांधवांना दिव्यांग कल्याणकारी 5 % निधीचे वाटप करण्यात यावे, विना अट घरकुल, बचत गटांना अर्थ सहाय्य देण्यात यावे,घरपट्टी व नळपट्टी मध्ये 50 टक्के सूट  देण्यात यावी, ग्रामपंचायतीने दिव्यांग बांधवांचा सर्वे करण्यात यावा,ग्रामपंचायत मार्फत उभारण्यात आलेल्या व्यापारी संकुलात दिव्यांग व्यक्ती करिता व्यापारासाठी गाळा उपलब्ध करून द्यावा,दिव्यांग बांधवान चे संजय गांधी योजने चे मानधन दरमहा बँक खात्यात जमा झाले पाहिजे,जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत  / प्रत्येक नगर पालिके मध्ये एक स्वीकृत दिव्यांग प्रतिनिधी नेमण्यात यावा,तसेच सर्व शासकीय योजनेचा दिव्यांग बांधवाना लाभ देण्यात यावा.या मागण्यासाठी निवेदन दिले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने