नाशिक कोळी समाज कार्य कार्यकर्त्यांचे विभागीय आयुक्तांना निवेदन
नाशिक दि.३० ( प्रतिनिधी) नाशिक येथील कोळी समाज कार्यकर्त्यांच्यावतीने काल दि.29 /04 / 2022 रोजी नाशिक येथे महसुल विभागीय आयुक्त श्री. राधाकृष्ण गमे यांना निवेदन देण्यात आले. त्यांनी निवेदनाचे अवलोकन करून वाचुन आपल्या कोळी समाजाचा आक्षेप या महाराष्ट्रातील जातपडताळणी प्रमाणपत्र तपासणी समितीलाच आहे. विषय गंभीर तर आहेच आंम्ही आधिकारी या नात्याने जरुर शासनाला कळवु असे आश्वासन दिले.
याप्रसंगी निवेदन देण्यासाठी समन्वय समितीचे नाशिक जिल्हाध्यक्ष श्री किसनभाऊ सोनवणे, भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे शहरउपाध्यक्ष श्री युवराज भाऊ सैंदाणे, श्री सुभाष बोराडे ( आरपीआय ),श्री किरन पगारे (भाजपा).श्री नवनाथ ढगे, भाजपा संयोजक उत्तर महाराष्ट्र भविआ. श्री गणेश राजकोर ,भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चा शहर चिटणीस. श्री रघुनाथ सुर्यवंशी कोळी समाज जेष्ठ नेते. अन्वर मुस्ताक सैय्यद, सामाजिक कार्यकर्ते भाजपा आदी उपस्थित होते.