छायाचित्रे १) ग्रामपंचायत कार्यालयाजवळच दफन विधी २) आमदार राहुलजी आहेर यांनी जिल्हाधिकारी यांना चौकशीचे निवेदन देतांना ३) तहसीलदार यांनी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच यांना बजावलेली नोटीस
खडकबांज गावात स्मशानभूमीचा प्रश्न पेटला..जागा येणे करतांना ग्रामपंचायतींची घोडचूक.. सरपंच उपसरपंचाने ३ दिवसात लेखी खुलासा सादर न केल्यास कारवाईचा बडगा? तहसीलदारांनी बजावली नोटीस* *झटपट पोलखोल वृत्ताची दखल प्रशासन अधिकाऱ्यांच्या बैठका सुरू..
*चांदवड दि.२७(प्रतिनिधी): तालुक्यातील खडकबांज गावात ग्रामपंचायतींच्या दूर्लक्षाने जागा येणे करतांना स्मशानभूमीला जाण्यासाठी रस्त्यांची तरतूद केली नसल्याने कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या भयावह प्रकाराने गेल्या काही दिवसांपूर्वी चक्क ग्राम पंचायत कार्यालयजवळच प्रेताला अग्नीदाग देण्याचा मन हेलावून टाकणारा प्रसंग ओढवल्याने संपूर्ण प्रशासकिय यंत्रणा खळबळून जागे झाली आहे.जिल्हाधिकारी यांनी बैठक घेऊन तातडीने चौकशी करण्याच्या सूचना दिल्याने तहसीलदारांनी सरपंच व उपसरपंचास नोटीस बजावून तीन दिवसांचे आत लेखी खुलासा सादर करावा अन्यथा आपल्या विरुद्ध कारवाईचा प्रस्ताव सादर केला जाईल असा आदेश फर्मावला आहे .
अधिक माहिती बजावण्यात आलेल्या नोटीसीवरून अशी की, मौजे खडकजांब ता. चांदवड येथील गट नं. १/२ व २/२ मधील स्मशानभुमी विवादाबाबत मा. जिल्हाधिकारी नाशिक यांचे दिनांक १९/०४/२०२२ रोजीचे बैठकीत दिलेल्या निर्देशनुसार कार्यवाही करणेबाबत सूचित करण्यात आले होते.
मौजे खडकजांब तो चांदवड येथील दुसरी स्मशानभूमी गुट नं. ३३५/२ लगत गट नं ३३६, ३३७/१,३३७/२,३३७/३, ३३८/अ, या मिळकतीचे सन-२०१४ मध्ये रहिवास प्रयोजनार्थसाठी बिनशेती परवानगी देण्यात आलेली आहे. तथापि सदर गट हे स्मशानभुमी लगत असतांना स्मशानभुमीकडे जाण्या येण्यासाठी रस्त्याचा विचार न करता ग्रामपंचायतीने बिनशेतीकामी नाहरकत देण्यात आलेला आहे. त्यामुळे आजरोजी अंत्यविधि कार्यक्रमासाठी रस्ता अस्तिवात नसल्याने वाद उपस्थित होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. सदर बाब की ग्रामपंचायतीचे दुर्लक्षामुळे झाल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे. याशिवाय ग्रामपंचायतीने सदर गट नं ३३५/२ मधील स्मशानभूमीचे शेड बांधताना -गट.नं.३३५/१ चे जमीन मालकास त्यांचे गटातून स्मशानभूमीसाठी रस्ता नाही असे देखील लेखी दिल्याचे गट नं. ३३५/१चे जमीन मालकाचे म्हणणे आहे. यावरून ग्रामपंचायतीने गट.नं.३३५/२ मधील स्मशानभुमीचे शेड बांधतानातांना रस्त्याची तरतुद / सोय केलेली नाही. त्यामुळे आज अंत्यविधी करण्याचा गंभीर प्रश्न निर्माण के झालेला आहे. तरी याबाबतचा लेखी खुलासा आपण लेखी स्वरूपात तीन दिवसाचे आत या कार्यालयात सादर करावा, अन्यथा सदर बाबत आपल्या विरुद्ध कारवाईचा प्रस्ताव मा. जिल्हाधिकारी नाशिक व मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांना सादर करण्यात येईल याची गंभीर्याने नोंद घ्यावी.असे आदेश चांदवडचे तहसीलदार प्रदीप पाटील यांनी खडकजांब गावाचे सरपंच व ग्रामसेवक यानां नोटीशीद्वारे बजावले आहेत.