चोपड्यात सर्व धर्म समभावतेचा सलोखा.. शांतता कमेटीच्या बैठकीत जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडेंचे प्रतिपादन..*



चोपड्यात सर्व धर्म समभावतेचा सलोखा.. शांतता कमेटीच्या बैठकीत जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडेंचे प्रतिपादन..*

चोपडा दि.०७ (प्रतिनिधी कैलास बाविस्कर) : चोपडा येथे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रविणजी मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक उत्साहात पार पडली.
चोपडा शहर हे शांतता प्रस्थापित करणारे मात्र काही विध्न संतोषी लोकांच्या आतातायी पणाने शहरास गालबोट लागले आहे.ते गेल्या काही वर्षांच्या शांततेने धुवून काढले आहे.ईथे विशेष म्हणजे सर्वधर्मीय लोकांचा सलोखा पाहवयास मिळतो तो मनाला भावणारा असायचं आहे असे गौरवोद्गार जिल्हा पोलिस अधीक्षकांनी यावेळी काढलें.
व्यास पीठावर माजी विधानसभा सभापती अरुणभाई गुजराथी, गटनेते जीवनभाऊ चौधरी,उप विभागीय पोलिस अधिकारी भास्कराव डेरे, तहसीलदार अनिल गावित, मुख्याधिकारी अविनाश गांगुर्डे, गटविकास अधिकारी कासोदे,राजेद्र पाटील (ता.प्रमुख शिवसेना ), नगरसेवक किशोर चौधरी , नगरसेवक राजाराम पाटील, नगरसेवक विकास पाटील ,शिवसेना पदाधिकारी प्रवीण जैन, गंभीर सर ,संजय निराधार समीती सदस्य कैलास बाविस्कर ,समन्वय पुनिॕलोकन समीती सदस्य मा.पोलीस निरीक्षक शहर, ग्रामीण   मराविम अभियंता गायकवाड , पत्रकार बांधव, आदी मान्यवर उपस्थित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने