आदिवासी कोळी समाज एकता मंचच्या बैठकीत संजय शिंदे व कल्पना ताई पिठे यांचा सत्कार.. नाशिकला वधू वर परिचय मेळावा घेण्याचे नियोजन
नाशिक दि.०५(प्रतिनिधी) झालेल्या आदिवासी कोळी समाज एकता मंचच्या सर्व कार्यकारीणी मंडळाची बैठक खेळी-मेळीच्या वातावरणात पार पाडली.
आदिवासी कोळी समाज एकता मंचचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.संजयजी शिंदे सर यांची अखिल भारतीय कोळी समाज संघटना (रजिस्टर)नवी दिल्ली महाराष्ट्र शाखेचे प्रदेश अध्यक्ष मा.श्री. परेशभाई कोळी यांच्या अध्यक्षतेखाली मा शिंदे सरांना नाशिक जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. तसेच कोळी समाज एकता मंचच्या सदस्या मा.श्रीमती कल्पनाताई पिठे यांनाही नाशिक जिल्हा महिला अध्यक्षा पदी नियुक्ती करण्यात आली त्याबद्दल नाशिक आदिवासी कोळी समाज एकता मंचच्या वतीने दोघांचाही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
तसेच आदिवासी कोळी समाज एकता मंचच्या बैठकीत खालील निर्णय घेण्यात आले असून त्यास सर्वांची मंजुरी मिळाली.
१) नाशिक शहरात वधु-वर परीचय मेळाव्याचे सन २०२३-२०२४ मध्ये नियोजन करणे.
२) समाजाविषयी कुठल्याही बैठकीचे आयोजन श्रमिकनगर सातपूर नाशिक येथील आपल्या समाजाचे आराध्यदैवत श्री महर्षी वाल्मिक ऋषी मंदिर येथे करण्याचे ठरवले आहे.
३) आता होऊ घातलेल्या नाशिक महानगरपालिका पंचवार्षिक निवडणूक २०२२ च्या निवडणुकीत आपल्या समाजाचे धडाडीचे,सामाजीक कार्यकर्ते श्री युवराज चिंतामण सैंदाणे हे प्रभाग क्रमांक ३४ मध्ये अनुसूचित जमाती या राखीव जागेवर इच्छुक उमेदवार असल्याने त्यांना सहकार्य करण्यासाठी समाज बांधवांना आवाहन करण्याचे ठरवले आहे. असे हे सर्व विषय बैठकीत ठरवली आहेत.
यासाठी मा. संजयजी शिंदे सर,मा.युवराज सैंदाणे, मा किसनभाऊ सोनवणे,मा.नितीन शेवरे, मा लक्ष्मणजी कोळी सर, मा. सुभाष मासरे सर, मा.प्रकाश शिरसाठ, मा. चंद्रकांत कोळी, मा सौ.वैशालीताई सौंदाणे-चव्हाण, मा. श्रीमती कल्पनाताई पिठे, मा.सौ.शिंदेताई, मा.सौ.सरिताताई कोळी, मा. सौ.शितलताई शिरसाठ आणि इतर समाज बांधव उपस्थित होते.