चोपडा ग.स.तर्फे प्रशासक विजयसिंह गवळी यांचा सत्कार..*
*चोपडादि.25(प्रतिनिधी)* जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी लि.जळगाव व ग.स. कर्मचारी हितकारणी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेच्या कर्मचाऱ्यांसाठी लेखापरीक्षणाच्या आवश्यक कामकाज पद्धती व संगणक कामकाजासह ग.स.मोबाईल ॲप प्रशिक्षणाचा एक दिवसीय कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी संस्थेचे प्राधिकृत अधिकारी मंडळ प्रमुख विजयसिंह गवळी व प्रशांत विरकर यांचा चोपडा शाखेतर्फे स्टाफ् सोसायटीचे माजी संचालक जगन्नाथ बाविस्कर यांच्या शुभहस्ते यथोचित स्वागत व सत्कार करण्यात आला.
सत्कारप्रसंगी संस्थेचे व्यवस्थापक वाल्मीकराव पाटील, लेखापाल श्यामकांत सोनवणे,स्टाफ् सोसायटीचे विद्यमान संचालक नारायण शिरसाठ, चोपडा शाखेचे आनंदराव बोरसे, स्मिता मोरे, दिलीप सपकाळे, शिवाजी बाविस्कर, माधवराव सोनवणे, शरद पाटील,जगन्नाथ बाविस्कर, प्रवीण सत्तेचा,शितल मोरे,सुरेश पाटील,विजय पाटील,उज्वल शिंदे यांच्यासह सर्व कर्मचारी उपस्थित होते.
.............................................
*प्रशासकीय कार्यकाळ सुवर्णाक्षरांनी लिहिला पाहिजे..*
ग.स.चे प्रशासक विजयसिंह गवळी यांनी आपल्या कार्यकुशलतेने संस्थेच्या अनावश्यक खर्चास प्रतिबंध करून सभासदांच्या कर्जावरील व्याजदर कमी केलेले आहे.कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाच्या रक्कमा देणे,सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती करणे,सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना उपदानाच्या रकमा देणे,थकबाकी वसुलीसाठी विशेष प्रयत्न करून संस्था नफ्यात ठेवली आहे.म्हणून संस्थेने हा प्रशासकीय कार्यकाळ सुवर्णाक्षरांनी लिहिला पाहिजे..
*.....जगन्नाथ बाविस्कर,*
उपशाखाधिकारी..ग.स.शाखा चोपडा.
..................................................