सूरमाज फाऊंडेशन तर्फे रमेशभाऊ शिंदे यांचा सत्कार*




 *सूरमाज फाऊंडेशन तर्फे रमेशभाऊ शिंदे यांचा सत्कार*

चोपडा दि.२५(प्रतिनिधी): येथील सूरमाज फाउंडेशनच्या वतीने नगरसेवक रमेश ग्यानोबा शिंदे यांचा चोपडा ग्रामीण औद्योगिक वसाहत संस्थेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला आहे.

 रमेश भाऊ जे चोपडा नगरपरिषदेचे गेली अनेक वर्षे पासून अतिशय चांगले कार्यकर्ता व नगरसेवक आहेत.  त्यांच्या कार्यकाळात केजीएन कॉलनी आणि चोपडा शहरातील अनेक क्षेत्रांची प्रगती झाली असून त्यांच्या कार्य धोरणा मुळे त्यांची 'चोपड़ा ग्रामीण औद्योगिक वसाहत लिमिटेड' च्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली, त्या मुळे हाजी उस्मान शेख (अध्यक्ष, सूरमाज फाऊंडेशन) यांनी पुष्पगुच्छ आणि  फुलांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.  आपल्या गावाचा असाच विकास करत सामाजिक कार्यात हातभार लावावा अशी अपेक्षा केली.  सत्कार करताना अबुलौस शेख, झियाउद्दीन काझी साहब, डॉ. रागीब, शोएब शेख, मुजाहिद इस्लाम, डॉक्टर मोहम्मद जुबेर शेख व सूरमाज फाऊंडेशनचे सहकारी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने