डांभुर्णी येथे साहित्यिक कै.दिवाकर दादा चौधरी यांची तिसरी पुण्यतिथी साजरी*सैनिक भुषण सोनवणे या माजी विद्यार्थिचा सत्कार*
मनवेल ता.यावल दि.०४ (प्रतिनीधी )
डांभुर्णी येथील दिवाकर खंडू चौधरी विद्यालयात नवयुवक विद्या प्रसारक मंडळ डांभुर्णी चे माजी अध्यक्ष कै.दिवाकर श्रावण चौधरी (दिवाकर दादा) यांची तिसरी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. प्रतिमापुजन डांभुर्णी चे उपसरपंच मा.पुरजितभाऊ चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले.त्याप्रसंगी त्याच्या स्मरणार्थ वटवृक्षाची रोपण करण्यात आले.
तसेच कोळन्हावी येथील रहिवासी भुषण समाधान सोनवणे यांचे सैनिक भरती झाल्याबद्दल सत्कार श्री० पुरजीत भाऊ चौधरी (जिल्हा अध्यक्ष संरपंच परिषद,उपसरपंच डांभुर्णी) यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच सैनिक भुषण सोनवणे यांच्या आईवडील यांचाही सत्कार करण्यात आला. सुत्रसंचलन श्री० रविन्द्र निळसर यांनी केले.मुख्याध्यापक श्री० उमाकान्त महाजन यानी आपले मनोगत मांडले.श्री०पुरजित भाऊ चौधरी यांनी दादासाहेब दिवाकर चौधरी यांचे जीवनचरित्र कथन केले.