पत्रकार अनिल मुजूमदार यांचा भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम पुरस्काराने सन्मान*
जळगाव दि.३०(प्रतिनिधी):येथील आदिलशाह फारुकी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवर व्यक्तींना भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम पुरस्कार- २०२२ दिला जात असतो.
त्या अनुषंगाने साकळी ता. यावल येथील ज्येष्ठ पत्रकार अनिल मुजुमदार यांना पत्रकारिता क्षेत्रात चाळीस वर्ष उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल या वर्षाचा भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम पुरस्कार -२०२२ जाहीर झालेला आहे. सदर पुरस्काराचे वितरण जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील अल्पबचत भवन या ठिकाणी दि. ८ मे रोजी आयोजित पुरस्कार वितरण कार्यक्रमात केले जाणार आहे. या कार्यक्रमात अनिल मुजूमदार यांना सदर पुरस्कार सन्मानपूर्वक दिला जाणार आहे. सदर पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अनिल मुजुमदार यांचे सर्वत्र स्वागत केले जात आहे.