शिवसेना शाखा १५ आणि १७ च्यावतीने गुढीपाडवा हिंदू नव वर्ष निमित्त विविध कार्यक्रमचे आयोजन

 


शिवसेना शाखा १५ आणि १७ च्यावतीने गुढीपाडवा हिंदू नव वर्ष निमित्त विविध कार्यक्रमचे आयोजन 

मुंबई दि.०१ एप्रिल (शांताराम गुडेकर ): गुढीपाडवा हिंदू नव वर्ष निमित्त गुढी उभारून पारंपारीक वेशभूषा पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे.वॉर्ड नंबर १५ आणि १७ च्या रहीवाशांना सर्वांना विनंती आहे की या निमित्ताने आपली उपस्थिती अनिवार्य आहे.ते पण पारंपरिक वेशभूषेत लहान मुलांना व महिलांना विशेष करून विनंती आहे ताई,माई,अक्का यांनी आपल्या कार्यक्रमासाठी वेळ काढून नक्की यावे.हा आपला सर्वांचा घरचा उत्सव आहे.शनिवार दिनाक ०२/०४/२०२२ रोजी  ब्रम्हा विष्णू मंदिर शिंपली गाँव येथे सकाळी ७:३० वाजता या उत्सवला सुरुवात होईल तर शिवसेना शाखा १५,आदित्य कॉलेजच्या मागे समाप्त होणार आहे. शिवसेना  शाखा क्र १५ व १७ आणि शिवबा मित्र मंडळतर्फे जल्लोष आणि आनंदोतस्व एकत्रीत साजरे करू या.तरी रहिवाशांनी मोठया संख्येने या कार्यक्रम मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन उपविभाग प्रमुख दामोदर म्हात्रे,शाखा प्रमुख श्री. सुनिल पाटील,शाखा प्रमुख श्री सचिन म्हात्रे शिवसेना शाखा १५ आणि  १७ च्या महिला -पुरुष,युवा  पदाधिकारी, सदस्य आणि तमाम शिवसैनिक यांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने