*खान्देशची भूमी आता केळी कापुस सोबत कविता पिकवणारी अरुणभाई गुजराथी*
विचरखेडा ता.चोपडा दि.०१ एप्रिल (वार्ताहर चंद्रकांत पाटील) : खान्देशची भूमी केळी कापूस साठी प्रसिद्ध असली तरी त्यात अलिकडे कविता देखील फुलायला लागल्या आहेत असे प्रतिपादन राज्य विधान सभेचे माजी सभापती अरुण भाई गुजराथी यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष राजेंद्र पाटील, युवक अध्यक्ष मनोज युवराज पाटील जगदिश पाटील यांनी आयोजित सत्कार समारंभात अरुणभाई बोलत होते. जिनींग प्रेसिंग आवारात दिनांक ३१ मार्च रोजी सायंकाळी आयोजित कार्यक्रमात अरुणभाई गुजराथी यांनी ज्येष्ठ पत्रकार तथा कवी साहित्यीक रमेश जे. पाटील यांचा टोपी ,रुमाल व पुष्पगुच्छ देऊन
गौरव केला. यावेळी 'तण' ही कविता वाचून उपस्थितांना कवी पाटील यांनी साहित्यिक मेजवानी दिली. प्रा. राधेशाम पंडित पाटील, पाणी वापर संस्था विचखेड्याचे चेअरमन चंद्रकांत पाटील, म.सा.प. सदस्य छोटू वारडे यांचाही यावेळी गौरव करण्यात आला . शेवटी आभार राजेंद्र पाटील यांनी मानले.