लासूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सहाय्यिका श्रीमती आशा पंडित गजरे यांचा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान

 


लासूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सहाय्यिका श्रीमती आशा पंडित गजरे यांचा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान 

लासूर ,ता चोपडादि.०१एप्रिल(प्रतिनिधी) :- येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सहाय्यिका श्रीमती आशा पंडित गजरे यांना नुकताच पनवेल येथे साधना न्यूज चैनल कडून जीवन गौरव पुरस्कार देवून गौरवण्यात आले. त्यानिमित्ताने येथील पंचायत समितीचे माजी सदस्य अनील पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी सरपंच दिलीप कोळी, जिल्हा गटसचीव संघटनाचे खजिनदार विजय पाटील, माजी उपसरपंच वसंत पाटील, विकास सोसायटीचे संचालक श्रीराम पालीवाल, नाटेश्वर पिकं संरक्षण सोसायटीचे संचालक सुभाष माळी (जिभू टेलर) शकिल शहा, माजी विकास सोसायटीचे संचालक लक्ष्मण बाविस्कर, महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष प्रकाश कोठारी, संचालक विक्रम जावरे, माजी संचालक सोमनाथ सोनार, अशोक पाटील, पत्रकार आत्माराम पाटील संदिप जैस्वाल, राहूल पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ नितीन अहिरे, श्री चव्हाण, श्री तायडे, यांच्या सह प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी पंचायत समितीचे माजी सदस्य अनिल पाटील, विक्रम जावरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने