बांधकाम क्षेत्रातील नामांकित व्यक्तीमत्व व सामाजिक कार्यातील दातृत्वशाली ह्रदयाचे "काकासाहेब" श्री.रमेशकुमार मुणोत यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान..सुप्रसिद्ध मराठी अभिनेता हास्य जत्रा फेम सचिन चौघुले यांच्या वरद हस्ते होणार ७ एप्रिलला होणार गौरव*

 बांधकाम क्षेत्रातील नामांकित व्यक्तीमत्व व सामाजिक कार्यातील दातृत्वशाली ह्रदयाचे "काकासाहेब" श्री.रमेशकुमार मुणोत यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान..सुप्रसिद्ध मराठी अभिनेता हास्य जत्रा फेम सचिन चौघुले यांच्या वरद हस्ते होणार ७ एप्रिलला होणार गौरव*  


जळगाव, (प्रतिनिधी)- येथील नामांकित ॐ साई रिअल इस्टेट कॅन्सलटन्टचे संचालक रमेश कुमार मुणोत ऊर्फ काकासाहेब यांना प्रेरणा दर्पण फाउंडेशनचा 'जीवनगौरव पुरस्कार' जाहीर करण्यात आला असून  सुप्रसिद्ध मराठी अभिनेता हास्य जत्रा फेम सचिन चौघुले यांच्या वरद हस्ते हा पुरस्कार  गुरवार दिनांक 7 एप्रिल 2022 रोजी प्रदान करण्यात येणार आहे.

चोपडा येथील प्रेरणा दर्पण फाउंडेशनच्या वतीने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल विविध मान्यवरांना दरवर्षी सन्मानित करण्यात येते. आपला व्यवसाय सांभाळत ॐ साई रिअल इस्टेट कॅन्सलटन्टचे संचालक रमेशकुमार मुणोत यांनी सामाजिक क्षेत्रात अमूल्य योगदान दिले असून या उल्लेखनीय कार्याची दखल घेत प्रेरणा दर्पण फाउंडेशन या संस्थेने 'जीवन गौरव पुरस्कार' जाहीर केला असून सुप्रसिद्ध मराठी अभिनेता हास्य जत्रा फेम सचिन चौघुले यांच्या शुभ हस्ते पुरस्कार वितरण करण्यात येणार असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

 माननीय श्री.रमेशकुमार मुणोत काकासाहेब हे मन मिळावू स्वभावाचे  सुख दुख्खाचे चटके खात "परिसाचे" काम करीत आहेत. कोणीही त्यांच्याकडे मदतीसाठी गेले तरी खाली  हात येण्याचा प्रसंग कोणावर ओढवला नाही.समोरच्याची निकड पाहुन हातात हात देणेच ते पसंत करतात. आपल्या प्रेमळ, सुस्वभावाने जिल्ह्यात परिचित असून बांधकाम क्षेत्रातील नामवंत व्यक्तींच्या ओठांवर त्यांचें नांव खेळते आहे त्यांच्या उपरोक्त गौरवाबद्दल त्यांचें झटपट पोलखोल न्यूज परिवारातर्फे मनापासून अभिनंदन त्यांना परमेश्वर दीर्घायुष्य देऊन अशीच जन सेवा घडत राहो हीच प्रार्थना..!🙏🏼🙏🏼🌹🌹

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने