*विधान परिषदेचे आमदार रमेशदादा पाटील यांच्या निधीतून दापोरी गावात रस्ता कामांचा भूमिपूजन सोहळा..आर.आर.फाऊंडेशनच्या सौ.स्वातीताई अजय बाविस्कर यांच्या प्रयत्नांना यश.. प्रल्हाद बाविस्कर यांच्या हस्ते शुभारंभ*

 विधान परिषदेचे आमदार रमेशदादा पाटील यांच्या निधीतून दापोरी गावात रस्ता कामांचा भूमिपूजन सोहळा..आर.आर.फाऊंडेशनच्या सौ.स्वातीताई अजय बाविस्कर यांच्या प्रयत्नांना यश.. प्रल्हाद बाविस्कर यांच्या हस्ते शुभारंभ* 


जळगाव दि.२८(प्रतिनिधी): तालुक्यातील दापोरी गावी विधानं परिषदेचे  आमदार मा.श्री. रमेशदादा   पाटील यांच्या निधीतून रस्ता कॉक्रीटकरणांचे काम मंजूर होऊन भूमीपूजन सोहळा दादासो, प्रल्हाद रामदास बाविस्कर यांच्या शुभ हस्ते नारळ फोडून नुकताच करण्यात  आला

दापोरी येथे मारुती मंदिर ते गिरणानदी कडे जाणारा रस्ता कॉक्रीटकरणांचा हा सोहळा होता , गांवातील विविध विकास कामांच्या मागणी पैकी या रस्त्यांची  मुख्य मागणी होती व ती मागणी आर. आर. फाऊंडेशन चे अध्यक्ष ताईसो. स्वाती अजय  बाविस्कर (अमळनेर)ह्यांनी श्री. रमेशदादा पाटील विधानपरिषदेत सदस्य यांच्या कडे लावून धरली होती त्यांनी त्यांच्या निधीतून मंजूर करून  व भविष्यात मंत्रालयांतुन मोठा निधी मंजूर करून देण्याची ग्वाहीही  यावेळी दिली . याआधी ताईनी नऊ लाखांचे काम गांवात पुर्ण केले आहेत या प्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणून गांवाचे सरपंच सौ. कल्याणी व श्री. निलेश पाटील, मा. नगरसेविका सौ. लक्ष्मीबाई प्रल्हाद बाविस्कर, मा. जि. प. सदस्य श्री. भिकाभाऊ कोळी, उपसरपंच श्री. कुंदन कोळी, श्री. संजय मराठे, श्री. भागवत कोळी, श्री. शरद कोळी व इतर सर्व गांवातील मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने