छायाचित्र..तुषार भटू पाटील
अनेर डोहात बुडणाऱ्या दोघांना वाचवले गणपूरच्या तुषारच्या धाडसाचे कौतुक
गणपूर(ता चोपडा)ता 28: येथील अनेर नदीपात्राच्या डोहात आंघोळीला गेलेल्या दोन्ही शाळकरी मित्रांना बुडतांना पाहून तेथे असलेल्या तुषार भटू पाटील या 17 वर्षीय विद्यार्थ्याने धाडस करून उडी घेत दोघांना वाचवल्याने त्याच्या धाडसाचे कौतुक होत आहे. येथील नदी च्या साचलेल्या पाण्याच्या डोहात दोन शाळकरी मुले पोहतांना डोहात बुडू लागली, मात्र तेथे फिरायला गेलेल्या तुषार ला या मुलांनी आरोळी मारली.परिस्थिती लक्षात घेत त्याने नदीत उडी मारून करदोडा धरून दोघांना बाहेर काढत वाचविल्याचे सांगितले. यापूर्वीही त्याने मुलांना बुडतांना वाचविल्याचे सांगितले.तुषारच्या धाडसाचे गावात कौतुक होत आहे............