तब्बल सात वर्षांनी राजुरी- उंचखडक गावी बैलगाडा शर्यत ३०० पेक्षा जास्त स्पर्धकांचा समावेश





तब्बल सात वर्षांनी राजुरी- उंचखडक गावी  बैलगाडा शर्यत ३०० पेक्षा जास्त  स्पर्धकांचा समावेश

राजुरी- उंचखडक ,ता-  जुन्नर  दि.१८(सावळाराम आहेर):   तालुक्यात तब्बल सात वर्षा नंतर बैलगाडा शर्यत भरवण्यात आली या बैलगाडा शर्यती मध्ये  अनेक तालुक्यांमधील बैलगाडा मालकांनी सहभाग घेतला आज   300 पेक्षा जास्त टोकण पर्यंत गाडे पळवण्यात आले आणि राहिलेले 350 गाडे उद्या   पळवण्यात येतील असे ग्रामस्थ उंचखडक राजुरी यांनी सांगितले.

 बऱ्याच वर्षांनी भैरवनाथाची यात्रा बैलगाडा  शर्यती भरून पाडण्यात आली मोठ्या खेळीमेळीचे वातावरण होते या यात्रेमध्ये   बारीक-बारीक हॉटेल, खेळणी विक्री वाले, आईस्क्रीम, वडापाव, पाणी बिसलरी विकणारे असे अनेक छोटे-मोठे व्यवसाय करणारे यांनी सर्वांनी यात्रेत सहभाग घेऊन मोठा उत्सव वाढवला यात्रा बऱ्याच दिवसानंतर भरल्यामुळे ग्रामस्थ, मुंबईकर मंडळी , जवळच्या गावांमधून आलेले  बैलगडा प्रेमी आनंदात होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने