*रॉयल एजंसी चे संचालक सैय्यद अमजद भाई यांचा पोलिस अधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार.. छत्रपती राजे शिवाजी महाराजांच्या जयंती सोहळ्यात दिले होते महत्वपूर्ण योगदान..*
चोपडा दि.०७(प्रतिनिधी): कधी नव्हे इतक्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आलेल्या शिव जयंती समारोहात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या सर्वधर्म समभाव विचारांचे युवा कार्यकर्ते तथा रॉयल एजंसी चे संचालक सैय्यद अमजद भाई यांच्या यथोचित गौरव पोलिस विभागातर्फे नुकताच करण्यात आला आहे.
चोपडा शहरात शिवजयंती उत्सव समिती तर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जंगी सोहळा आयोजित करण्यात आला होता.त्यात रॉयल एजंसी चे संचालक सैय्यद अमजद भाई यांनी संगिताच्या सुमधुर निनादाची "डीजे" माध्यमातून व फटाक्यांच्या आतिषबाजीत मोलाचं आर्थिक योगदान देऊन सहभाग घेतला होता त्यामुळे त्यांचा सत्कार पोलीस अधिकारी अवतारसिंग चौहान साहेब, आणि किरण दांडगे साहेब यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी मान्यवर व समिती पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.