आमदार गिरीशभाऊ महाजन यांच्या यावल, रावेर दौऱ्याने कार्यकर्त्यांमध्ये वाढला उत्साह

 

आमदार गिरीशभाऊ महाजन यांच्या यावल, रावेर दौऱ्याने कार्यकर्त्यांमध्ये वाढला उत्साह


जळगावदि.३०( प्रतिनिधी )...गेल्या अनेक दिवसांपासून माजी मंत्री आमदार गिरीशभाऊ महाजन यांनी नुकताच यावल आणि रावेर तालुक्यात दौरा करून भाजपा कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या. आमदार गिरीशभाऊ महाजन यांनी केलेल्या आजच्या दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. 

विधान परिषदेचे अधिवेशन आणि त्यात त्यांच्या मुलीचा विवाह यामुळे आमदार गिरीशभाऊ महाजन या कामांमध्ये व्यस्त होते. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी शक्य झाले नाही. दरम्यान रावेर आणि यावल तालुक्यात सध्या विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणूका झाल्या आहेत. यातील अनेक विकासोवर भाजपाची सत्ता आल्या आहे. त्यानिमित्तानेनुकताच माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी विकासोवर निवडणून आलेल्या उमेदवारांची भेट घेवून पुष्पगुच्छाने सत्कार करण्यात आला. यावेळी गिरीशभाऊ यांनी रावेर आणि यावल तालुक्यातील तालुकाध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांची भेट घेवून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने