शासकीय शौचालयाचा वापर चक्क म्हशींसाठी ..तावसे बुद्रूकला अजब कारभार.. ग्रामपंचायत चालकांविषयी प्रचंड संताप
चोपडा दि. ३० (प्रतिनिधी) :---अनेक गावात शासकीय शौचालयांमध्ये गोवर्या , सरपणाची लाकडे ,निरुपयोगी वस्तू शौचालयात भरून ठेवतात पण तावसे बु!! येथील श्रीदत्त मंदिर परिसरातील शासकीय शौचालयामध्ये एकाने अतिक्रमणच केले आहे .त्याने शासकीय शौचालयात अक्षरश: गुरांचा चारा कोंबला आहे. जणूकाही सदर शौचालयावर त्याच्याच अधिकार आहे व त्याने तो शौचालय स्वखर्चाने बांधलेला आहे. गुरांच्या चारा सोबत, टोपल्या ,फावडे इतर साहित्य देखील निदर्शनास आले आहे .हा सगळा प्रकार ग्रामपंचायतीला माहिती नसावा का ? असा सवाल सुज्ञ नागरिक विचारत आहेत.
शौचालयाच्या गैरवापर होत असल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे .गोदरी मुक्ती बाबत प्रशासनाकडून प्रभावी जनजागृती केली जात नसल्याने, अनेक व्यक्ती अजूनही शौचालयाच्या वापर करीत नसल्याचे सुज्ञ नागरिकांचे म्हणणे आहे.
सार्वजनिक शौचालय हा स्वच्छ भारत मिशन अंतर्गत एक महत्त्वाचा घटक आहे .सामान्यपणे कुटुंबांना शौचालय बांधण्यासाठी जागा उपलब्ध नसेल आणि कुटुंबाने सार्वजनिक शौचालयाची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी स्वीकारली असेल तरच सार्वजनिक शौचालयांचे बांधकाम करावे असे असताना देखील तावसे बु!! येथील शासकीय शौचालयाचा गैरवापर झाला कसा ? हा कळीचा मुद्दा आहे .सदर बाबींकडे ग्रामसेवक व ग्रामपंचायतीने त्वरित लक्ष देण्याची मागणी सुज्ञ नागरिकांनी केली आहे......