पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत 2021-22 ग्रामीण भागात रमाई घरकूल योजनेसाठी तालुका निहाय प्रस्तावाना मान्यता

 


पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत 
2021-22 ग्रामीण भागात रमाई घरकूल योजनेसाठी तालुका निहाय प्रस्तावाना मान्यता

          जळगाव, दि.29 (प्रतिनिधी) : - जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली 11 मार्च, 2022 व 28 मार्च, 2022 रोजी झालेल्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागचे अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांसाठी रमाई घरकूल योजना ( ग्रामीण क्षेत्र) सभा संपन्न झाली, या सभेत जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागात रमाई घरकूल योजनेसाठी खालील प्रमाणे तालुका निहाय घरकूलांना  2021-22 या करीता मान्यता देण्यात आली आहे.

                चोपडा – ९०, धरणगाव-१००, एरंडोल -१२०, पारोळा – ५००, रावेर – २१५, भडगाव – १७४, भुसावळ ४५,       अमळनेर -९५, जामनेर – २१, पाचोरा – ३८, यावल -८४, चाळीसगाव-२२०, मुक्ताईनगर- १५०, जळगाव-१०३ असे एकूण १९५५ प्रस्तावाना मान्यता देण्यात आलेली आहे. असे योगेश पाटील सहाय्यक आयुक्त समाज कल्याण जळगाव  यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने