*आस्था अनघादि फाउंडेशन,आदिवासी वाल्मीकलव्य सेना, रुक्मिणी बाई चॅरिटेबल ट्रस्ट, यांच्या संयुक्त विद्यमाने दुर्गम भागातील महिलांना सॅनिटरी नॅपकिन वाटप करून जागतिक महिला दिन साजरा



*आस्था अनघादि फाउंडेशन,आदिवासी वाल्मीकलव्य सेना, रुक्मिणी बाई चॅरिटेबल ट्रस्ट, यांच्या संयुक्त विद्यमाने  दुर्गम भागातील महिलांना सॅनिटरी नॅपकिन वाटप करून जागतिक महिला दिन साजरा 

नाशिक दि.१०(प्रतिनिधी): 8 मार्च 2022 रोजी नाशिक जिल्ह्यातील दुर्गम भागातील वसाळी गावठाण या ठिकाणी  जागतिक महिला दिन व संस्थेच्या प्रेरणास्थान असलेल्या स्वर्गीय. निर्मला देवी चव्हाण यांच्या स्मृतिदिना  उजाळा देत ,दुर्गम भागात तरुणी व महिलांसाठी सॅनेटरी नॅपकिन वाटप, त्याचसोबत घ्यावयाची काळजी तसेच ,आरोग्य विषयी चर्चा व उपाय योजना .नाशिक जिल्ह्यातील वसाळी गावठाण या दुर्गम भागात उपक्रम राबविण्यात आला.

प्रथम संस्थेच्या प्रेरणास्थान असलेल्या स्वर्गीय.निर्मला देवी चव्हाण यांच्या फोटोला जेष्ठ ग्रामस्थ ह.ब.प. मच्छिंद्र निगळ बाबा व ग्रामस्थ महिला यांच्या हाताने पुष्पहार घालुन व पुजा करून उपक्रमास सुरुवात केली.संस्थेच्या वैशाली चव्हाण म्हणाल्या की, मासिक धर्म हा महिलांच्या साठी शाप नसून वरदान आहे .मातृत्व हे आपल्याला लाभलेला असा अलौकिक आशीर्वाद आहे. परंतु शहरी भाग सोडला तर ग्रामीण आणि अतिदुर्गम भागात मासिक धर्माविषयी चर्चा करायला देखील महिलांना लज्जा उत्पन्न होते .वास्तविकता मासिक धर्म हा फक्त महिलांच्या शरीरात महिन्यातून होणारा एक बदल असतो. जेव्हा मुलींनमध्ये हा बदल घडातो, तेव्हा पालकांनी माता, पिता ,भाऊ यांनी मुलींना मानसिक आधार देऊन तो बदल सहजपणे मुलींनी स्विकारावा म्हणून सहकार्य केले पाहिजे. सातपुर शहर अध्यक्ष सरिता ताई कोळी यांनी आपण महिलांनी आपल्या स्वतःकडे व्यवस्थित लक्ष दिले पाहिजे. जर आपले शरीर आणि मन प्रसन्न असेल तर आपले घर  आणि घरातील माणसे देखील प्रसन्न असतील.असे म्हणाल्या, नाशिक जिल्हाध्यक्ष विजय कोळी सर यांनी जागतिक महिला दिनाचा इतिहास सांगून महिलांना शुभेच्छा दिल्या.व पालकांनी  मुलींच्या शिक्षणावर भर दिला पाहिजे,असे सांगितले. सिन्नर तालुका अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी महिलां विषयी चे जुन्या काळातील धोरण आणि आत्ताचे धोरण यातील फरक सांगून पुरुष बांधवांनी महिलांना साथ दिली पाहिजे, असे आवाहन केले. सातपूर शहराध्यक्ष चंद्रकांत कोळी यांनी अशा उपक्रमांची काळाची गरज आहै असे सांगितले. संस्थेच्या युवा अध्यक्षा अनघा सुनिल सौंदाणे यांनी नवतरुण युवतींना मार्गदर्शन करत सांगितले, की आपल्या पालकांशी आपले विचार स्पष्ट आणि मनमोकळे पणाने बोलत राहीले पाहिजे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या गावठाण पर्यंत पोहोचविणारी आमचे मच्छिंद्र घोटे यांचे खूप आभार .लहान समाजसेवक आदित्यवर्धन सौंदाणे याने  देखिल छायाचित्रे घेऊन सहकार्य केले.अशा पद्धतीने वसाळी गावठाण येथील महिला, ग्रामस्थांसह  महत्वाच्या आणि वेगळ्या विषयावर उपक्रम घेतल्या मुळे ग्रामस्थ यांनी देखिल आभार व्यक्त केले. या प्रसंगी ,देवयानी वाघ, स्वाती मधे, मीना आचारी, सुमन गावंडे, मंजुळा खेटरे,ताराबाई खेटरे,ललिता खेटरे,अनिता डंबाले,मंगल ससाणे, मनुबाई मधे, जिजाबाई बोंबले, मीरा बोंबले, मंगल वाघ, तुळसाबई मोंढे ,आदी महिला ग्रामस्थ उपस्थित होत्या.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने