गलंगी ते घोडगाव रस्त्याची खड्ड्यांमुळे दैनंदिन अवस्था..खड्डे वाचवण्याच्या नादात अपघाताला निमंत्रण

 



गलंगी ते घोडगाव रस्त्याची खड्ड्यांमुळे दैनंदिन अवस्था..खड्डे वाचवण्याच्या नादात अपघाताला निमंत्रण

गलंगी,ता.चोपडा दि.०६(प्रतिनिधी मच्छिंद्र कोळी): चोपडा गलंगी ते घोगाव रस्त्यावर मोठमोठे खड्डे निर्माण झाले असून वेळोदे गावाजवळ मोठा रोडच्या कडेला खड्डा पेव पडला असून याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे परिसरातील दहा ते 15 खेड्यातील ग्रामस्थांचे बोलले जात असून या रोडा च्या कडेलाच असलेला भलामोठा खड्डा पेवमुळे केळी वाहतूकची गाडी पलटी झाली किंवा मोठा अपघात झाला तर मोठा अनर्थ होण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही एका केळी वाहतूक गाडीवरती कमीत कमी 30 ते 40 मजूर असतात व त्यांच्या परिवार हा अलगच या रस्त्याला दहा ते पंधरा गावांचे येणे-जाणे असल्यामुळे नशिबाने कोणाचे घर उद्ध्वस्त होईल याची कल्पनाही केली बरी नाही या रस्त्यावर दिवसभर वाहनांची वर्दळ सुरू असते रस्त्याच्या कडेलाच मोठा पेव खड्डा असल्यामुळे अनेकदा दुचाकीस्वारांचा तोल जाऊन किरकोळ अपघाताच्या घटनादेखील घडत आहेत तसेच खड्डे चुकवण्याच्या नादात दोन वाहने समोरासमोर येत असल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही गलंगी ते घोडगाव रस्त्यावरील खड्डे जीव घेणे झाली असूनही खड्डे बुजविण्या कडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे परिसरातील व वाहनधारकांनी  नाराजी व्यक्त केली आहे

या रस्त्याचे त्वरित दुरुस्ती व वेळोदे गावाजवळील रस्त्याच्या कडेलाच असलेला मोठा खड्डा पेव पडला असल्यानेदुरुस्ती करावी अशी मागणीच्या जोर वाढू लागला आहे परिसरात गलंगी चोपडा शिरपुर महाराष्ट्रासह गुजरात मध्य प्रदेश जाण्यासाठी शेतकऱ्यांच्या एकमेव रस्ता असल्या कारणामुळे केळी कापूस व इतर घेऊन अवजड वाहनांन साठी पर्याय रस्ताच नसल्यामुळे ना इलाजास्तव  जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागत आहे असाही परिसरातील शेतकऱ्यांच्या संतप्त भावना उमटताना दिसून येत आहेत या वर्दळीच्या रस्त्यावरून अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते मात्र खड्ड्यांमुळे वाहने उलटून अपघात होण्याचा धोका वाढला आहे रस्त्याची फार दुरवस्था होऊनही सार्वजनिक बांधकाम विभागाचे का दुर्लक्ष होत आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने