लेण्यांच्या संवर्धनासाठी कठोर पावले उचलणे गरजेचे आहे..सम्यक सांस्कृतिक संघाचे आवाहन
------------------------------------
नाशिक/जळगाव दि.१४(प्रतिनिधी) भारताला लेण्यांचा मोठा वारसा लाभला आहे , लेण्यांमुळे बौद्ध तसेच भारतीय संस्कृती आजही टिकून आहे त्यामुळे लेण्यांच्या संवर्धनासाठी ठोस कार्यक्रम आखला जावा असे मत लेणीशिल्पचे अभयसक महेंद्र शेगावकर यांनी व्यक्त केले
सम्यक सांस्कृतिक संघ तर्फे दिनांक 13 मार्च रोजी नाशिक येथील प्रसिध्द त्रिरश्मी ( पांडव ) बौद्ध लेणी येथे एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली त्यावेळी मार्गदर्शन करतांना शेगावकर बोलत होते
संयोजक सुरज रतन जगताप यांनी प्रास्ताविक करून लेण्यांच्या विविध कलाकृतीची सविस्तर माहिती दिली व कार्यशाळा नियमित भरविण्यात येतील असे जाहीर केले
जळगाव येथील प्रसिद्ध साहित्यिक जयसिंग वाघ यांनी आपल्या समारोपीय भाषणात लेण्यांमध्ये मोठयाप्रमाणात अतिक्रमण होत असूनही त्याकडे पुरातत्व खाते दुर्लक्ष करीत आहे त्यामुळे भारतातील मूळ संस्कृती धोक्यात आली आहे , लेण्यांच्या संवर्धनाची मुख्य जबाबदारी पुरातत्व खात्याची आहे , लेण्यांमध्ये असलेल्या मुर्त्या हजारो वर्षांपासून आम्हाला मानवतावादी विचारांची शिकवण देत आहे , त्या मुर्त्या विशिष्ट धर्माच्या आहेत म्हणून त्याकडे दुर्लक्ष करून आपण मानवतावादा पासून पळ काढतो असा होतो असे विचार व्यक्त केले
या शिबिरास मुंबई ,पुणे , औरंगाबाद , जळगाव येथून मोठ्या संख्येने अभ्यासक आले होते या पुढील शिबिर दिनांक 25 व 26 मार्च रोजी पितळखोरा येथील लेणीत घेण्यात येत आहे असे शेवटी सुरज जगताप यांनी जाहीर केले