शिरपूर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदतर्फे शहिद दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न

 



शिरपूर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदतर्फे  शहिद दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न

 शिरपूर दि.२५ (प्रतिनिधी)भारत मातेचे वीर सुपुत्र सरदार भगतसिंह, राजगुरु आणि सुखदेव जी यांना आजच्याच दिवशी 23 मार्च 1931 रोजी इंग्रजी सरकारने लाहोरच्या जेल मध्ये फाशी दिली होती. त्यांचा बलिदान दिवस देशभरात शहीद दिन म्हणून मानला जातो.शहीद दिनानिमित्त आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शिरपूर तर्फे अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम घेऊन सरदार भगत सिंग यांना अभिवादन करण्यात आले.

23 मार्च सकाळी शिरपूर तालुक्यातील मांडळ येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत सरदार भगत सिंग, राजगुरू, सुखदेव यांना अभिवादन केले. यावेळी पंचायत समिती सदस्य मा. यतीश भाऊ सोनवणे, शाळेतील शिक्षक, व विद्यार्थी कार्यकर्ते उपस्थित होते.

दुपारी ४ वाजेला शिरपूर शहरातील सरस्वती विद्यालयात भगत सिंग यांना अभिवादन करण्यात आले, यावेळी शाळेतील मुख्याध्यापकांनी प्रसंगी आपले मत व्यक्त केले व अभाविपच्या कार्यकर्त्यांनी "स्वतंत्र भारत" यावर माहिती दिली. यावेळी शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक, कार्यकर्ते उपस्थित होते.

संध्याकाळी शहरातील "Arise Academy" ह्या क्लास मध्ये सरदार भगत सिंग यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी शिक्षक, विद्यार्थी, कार्यकर्ते उपस्थित होते.


या उपक्रमात अभाविपचे जिल्हा संयोजक नयन माळी, पवन राजपूत, हंसराज चौधरी, पृथ्वीराज लोहार, पार्थ राजपूत, सुमित गिरासे व कार्यकर्ते उपस्थित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने