*आठ बिघा" अफू "शेती तीनं महिने होऊनही अंधारात कशी..? शेत मजुरांपासून प्रशासनापर्यंत सर्वच अनभिज्ञ.. मग शेतीच्या बांधावर ही योजना कागदावरच आहे काय..?* *असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित.. उद्भवलेल्या प्रकाराला जबाबदार कोण कोण? जनता दरबारात चर्चा च चर्चा..!*
चोपडा दि.०४(प्रतिनिधी):तालुक्यातील घोडगाव शिवारात वाळकी येथे कोट्यवधी रुपयांची अफू शेती लागवड होऊन जवळपास तीन महिन्यांचा कालावधी पूर्ण होऊन ऐन माल पक्का होण्याच्या काही दिवस आधी या भयावह प्रकाराची माहिती गोपनीय माहितीच्या आधारावर उघड होणे याला काय म्हणावे असा संभ्रमावस्था निर्माण करणारा प्रश्न जनते समोर आला आहे.एव्हढा मोठा कालावधी लोटला गेला तरी आजूबाजूच्या शेतकऱ्यांना,शेतात काम करणाऱ्या शेतमजूरांना वा हर शेतिची पिक पेऱ्याची नोंद ठेवणाऱ्या महसूल कर्मचारी वा अधिकारी या सर्वांच्याच डोळ्यात अंजन घालून "अफूची "अनधिकृत बेकायदेशीर शेतीची निर्मिती झाली च् कसं काय ? हा यक्षप्रश्न डोके गरगरवणारा असाच आहे.तिहि एव्हढ्या मोठ्या प्रमाणावरील लागवड कसे काय?आठ बिघा शेती मशागत एकट्या दुकट्या चे काम नाही.शिवाय उघड्यावर शेती होत असते तरीही कोणालाच कसे काय दिसले नाही ? हा तर सर्वात मोठा प्रश्न आहे.तसेच अन्याय करणाऱ्या एव्हढाच अन्याय सहन करणारा दोषी असतो असे म्हटले जाते..मग बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या सोबतच माहिती लपवून ठेवणारेही कारणीभूत आहेत.शिवाय प्रशासकिय जबाबदार अधिकारी व कर्मचारी तसेच अनधिकृत कामाची माहिती देणारा गावातील दुवा असलेला पोलिस पाटील हाही अनभिज्ञ, तलाठी अनभिज्ञ,मंडल अधिकारी अनभिज्ञ,पोलिसांची गोपनीय शाखा अनभिज्ञ, गावकरी अनभिज्ञ, सर्वच कुंभकर्णी झोपेत कसे काय ? हा प्रश्न न पचणारा आहे . जळगाव जिल्ह्यात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर अफू लागवड झाल्याचा प्रकार अनेक प्रश्न उपस्थित करणाराच आहे.या भयावह प्रकारास खरे कोण कोण कारणीभूत आहेत .यांचा तपास होणे गरजेचे असल्याचे मत परिसरातील जनतेने व्यक्त केले आहे.
जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील घोडगांव शिवारात चक्क सहा एकरात शेतात आफू या पिकाची लागवड केल्यामुळे जळगाव जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
जळगाव जिल्ह्यातील हि मोठी कारवाई असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ प्रविण मुंढे यांनी या प्रसंगी माध्यमांशी बोलतांना सांगितले चोपडा तालुक्यातील वाळकी येथील शेतकरी प्रकाश सुधाकर पाटील यांच्या मालकीचे गट नंबर ४३२/२ मध्ये चक्क आफू या पिकाची लागवड केली होती. आतंरराष्ट्रीय बाजार पेठेत जवळ जवळ दोन ते तीन कोटी किंमत असल्याचे बोलले जात आहे. उत्तर महाराष्ट्र पहिल्यांदाच आफू ची लागवड एवढ्या मोठ्या प्रमाणावर केल्यामुळे नंबर दोनवाले व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे. दरम्यान पोलिस नाईक राकेश पाटील यांनी फिर्याद दिल्यामुळे चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात मद्य आंमली पदार्थ या कायद्या अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
रात्रभर या शेताच्या अवतीभवती पोलिसांचा चोख पहारा ठेवण्यात आला होता. सदर आरोपी हा धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथे लग्नानिमित्त गेला असता. आरोपीला घेण्यासाठी पोलिस हवालदार लक्ष्मण शिंगाणे, रितेश चौधरी, संजय यदे, सुनिल कोळी, यांचे पथक रवाना होवून सदर आरोपीला पकडण्यास यश आले आहे.
दरम्यान घटनास्थळी एसपी डॉ प्रविण मुंढे, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी श्री ढेरे, ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास कुनगर, उपनिरिक्षक श्री वसावे यांनी भेट देवून पंचनामा केला.
चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार राजू महाजन, सुनिल जाधव, विजय बाविस्कर, भरत नाईक व आरसिपी प्लाटून नंबर चार जळगाव चे यांच्या पथकाने पहारा ठेवला होता. याठिकाणी जळगाव हून फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले होते.यासर्व तपासात पुढे काय निष्पन्न होते याकडे जनतेचे लक्ष लागून आहे