*चोपड्यात २८ मार्चपासून चार दिवसीय मोफत सर्व रोग निदान, दंत व शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन*
चोपडा दि.२५(प्रतिनिधी)राज्य आरोग्य सोसायटी महाराष्ट्र शासन अतंर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान व जिल्हा रुग्णालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने
आदिवासी व ग्रामीण भागातील जनतेसाठी दि.२८.०३.२०२२ पासून मोफत सर्व रोग निदान, दंत व शस्त्रक्रिया शिबीराचे उपजिल्हा रुग्णालय, चोपडा येथे आयोजन करण्यात आले आहे
हे शिबिर चार दिवस चालणार आहे त्यात सोमवार दि. २८.०३.२०२२ : पहिल्या दिवशी रुग्णांची तपासणी केली जाईल. मंगळवार दि. : २९.०३.२०२२ : दुसऱ्या दिवशी शस्त्रक्रिया केली जाईल.दि. ३०.०३.२०२२ : तिसऱ्या दिवशी शस्त्रक्रिया केली जाईल.
गुरुवार दि. ३१.०३.२०२२ : चौथ्या दिवशी रुग्णांची शस्त्रक्रिया पश्चात तपासणी केली जाईल.
शिबीरात पुढील प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यात येतील.
● अॅपेंडीक्स • हर्निया
→ मुतखडा मुळव्याध, फिशर व भगंधर
● गर्भपिशवी - दातांच्या शस्त्रक्रिया लहान मुलांच्या शस्त्रक्रिया
● शरीरावरील गाठी
नाव नोंदणीसाठी खालील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपजिल्हा रुग्णालय, चोपडा या ठिकाणी सुरू आहे.....
प्रा.आ.केंद्र, गोरगांवले प्रा.आ.केंद्र, अडावद प्रा.आ. केंद्र, चहार्डी प्रा.आ.केंद्र, लासूर • प्रा.आ.केंद्र, हातेड प्रा.आ.केंद्र, वैजापूर प्रा.आ.केंद्र, भालोद प्रा.आ.केंद्र, हिंगोणे प्रा.आ.केंद्र, धानोरा प्रा.आ.केंद्र, किनगांव प्रा.आ.केंद्र, साकळी प्रा.आ. केंद्र, सावखेडा
या शिबिरात जिल्हा शल्यचिकित्सक, बालरोगतज्ञ, प्रसुती व स्त्रीरोग तज्ञ, दंतचिकित्सक, बधिरीकरण व अस्थिरोगतज्ञ असे विविध क्षेत्रातील डॉक्टर तज्ञ तपासणी करतील. तरी गरजु रुग्णांनी या सुवर्ण संधीचा पुरेपुर लाभ घ्यावा.. असे आवाहन.डॉ. र.दा. भोये(उपसंचालक, आरोग्य सेवा, नाशिक विभाग) डॉ. बी. टी. जमादार (जिल्हा आरोग्य अधिकारी, जळगाव),डॉ. किरण पाटील(जिल्हा शल्य चिकित्सक, सा.स. जळगाव),डॉ. मनोज पाटील(वैद्यकिय अधिक्षक, उपजिल्हा रुग्णालय, चोपडा)
डॉ. पंकज पाटील
(बाह्य संपर्क अधिकारी, सा.रू., जळगाव) यांनी केले आहे