सूरमाज फाउंडेशन चा ई-न्यूजलेटर प्रकाशित *



*सूरमाज फाउंडेशन चा ई-न्यूजलेटर प्रकाशित * 

चोपड़ा: 25 मार्च  (प्रतिनिधी):   गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात योगदान देणारी सूरमाज फाउंडेशन.  या वर्षी त्यांनी केलेल्या काही कामांचे वृत्तपत्राच्या रूपात प्रकाशन केले असून या गोष्टी लोकांनी समजून घ्याव्यात आणि सामाजिक कार्यात हातभार लावण्याचा प्रयत्न करावा हा त्यांचा उद्देश आहे.  कारण आयुष्य एक दिवस संपणार आहे आणि आपले चांगले काम हेच आपले खजिना आहे.  चोपडा शहरातील सामाजिक कार्यकर्ते एस.बी.नाना पाटील, ठेकेदार आरिफ भाई,  जियाउद्दीन काझी  यांच्या हस्ते वृत्तपत्राचे उद्घाटन करण्यात आले.  हाजी उस्मान शेख (अध्यक्ष सूरमज फाऊंडेशन) यांनी त्यांचे कार्य धोरण व पुढे काय योजना आहे हे सांगितले व आलेल्या पाहुण्यांचे आभार मानले.  डॉ. मोहम्मद रागीब, अबुलौस शेख, शोएब शेख, झुबेर बॅक आणि डॉ. मोहम्मद जुबेर शेख यांनी ई-न्यूजलेटरच्या यशस्वी प्रक्षेपणासाठी हातभार लावला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने