**मालमत्तेच्या वादातून पतिकडून वीष प्राषण..आईसह चिमुरड्यां मुलींनी विहिरीत उडी घेऊन केली आत्महत्या.. बिडगावच्या माहेरवाशिणीने असाही घेतला क्रूर निर्णय.. पोलिसांनी शोधासाठी रात्रभर पिंजला परिसर मात्र सकाळी पाण्यावर तरंगताना आढळले मृतदेह..!*








 **मालमत्तेच्या वादातून पतिकडून वीष प्राषण..आईसह चिमुरड्यां मुलींनी विहिरीत उडी घेऊन केली आत्महत्या.. बिडगावच्या माहेरवाशिणीने असाही घेतला क्रूर निर्णय.. पोलिसांनी  शोधासाठी रात्रभर पिंजला परिसर मात्र  सकाळी पाण्यावर तरंगताना आढळले मृतदेह..!* 

चोपडा दि.०३(प्रतिनिधी): तालुक्यातील बिडगाव येथील माहेरवाशीने प्राॅप्रटीच्या हिस्स्या वाटणीवरुन उद्भवलेल्या वादाच्या कारणावरून नवऱ्याने केलेल्या वीष प्राषणाच्या असह्य वेदनांच्या सीमा ओलांडून आपल्या चिमुरड्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे .मयत महिलेचे नाव सौ.वर्षाबाई विनोद कोळी असे असून मुलगी कीर्ती व मोना दोघींसह जगाचा निरोप गेल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. सदरील महिलेच्या पतीने रात्री विष प्राशन करताच महिला दोन्ही मुलींसह बाहेर पडाली होती तिचा गावकऱ्यांनी व पोलिसांनी रात्रभर परिसरात शोधाशोध केली होती मात्र ते मिळून आले नाहीत.सकाळी एका शेतात विहीर तिघांचे मृतदेह तरंगताना दिसून आल्याने गावात शोककळा पसरली.

याबाबत प्राप्त माहिती अशी की,

घरगुती कारणावरुन भांडणाचा वाद शिगेला गेल्याने पतीने संतापात विष घेतले. यानंतर पत्नीने दोन मुलांसह विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली. ही हृदयद्रावक घटना  बिडगाव ता. चोपडा येथे बुधवारी रात्री ११ वाजता घडली. 


विनोद विक्रम सपकाळे(कोळी) (३८) असे विष घेतलेल्या इसमाचे नाव आहे. त्याने विष घेतल्याचे समजल्यानंतर पत्नी वर्षा सपकाळे (वय ३२वर्षे) हिने कीर्ती (८) व  मोनिका ( ४) या दोन मुलींसह विहीरीत उडी घेतली. रात्रभर शोध घेतल्यानंतर गुरुवारी सकाळी माय लेकींचे मृतदेह गावाजवळील विहिरीत आढळून आले. 

विनोद यास जळगाव येथे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेने बिडगावसह परीसर हादरून गेला. सदर कुटुंब हे खामखेडा ता. शिरपूर येथील रहिवासी आहे. ते मागील आठ वर्षांपासून बिडगांव येथे मोलमजुरी करून राहतात

सकाळी अडावद पोलिस स्टेशन चे सपोनि किरण दांडगे यांनी घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थांच्या मदतीने तिन्ही मृतदेह विहिरीतून काढत शवविच्छेदनासाठी चोपडा उप जिल्हा रुग्णालयात रवाना केले.घटनास्थळी पोलिस उपविभागीय अधिकारी श्री.डेरे यांनी भेट दिली आहे.

मृतदेह काढण्यासाठी गावातील छोटू दाउद तडवी,दत्तु आत्माराम पाटील यांनी मोलाचे सहकार्य केलं . हे मृतदेह बिडगाव शिवारातील गट नं.२३४ (१)इक्बाल तडवी यांच्या शेतातील विहीरीत आढळून आले.अधिक  तपास अडावद  पोलीस करीत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने