आदिवासी भूमिला पद्स्पर्श करणारे पहिलेच लोकप्रतिनिधी चंद्रकांत सोनवणे व कार्यसम्राट आमदार सौ लताताई सोनवणे यांचा दूरदृष्टी विकास डोळ्यात साठवून ठेवण्या जोगाच..* *वरगव्हाण व शेवरे येथील संरक्षण भिंतीचे काम प्रगतीपथावर.. सोडा भूलथापा..अन् सत्याला मापा...सरपंच भूषण पाटील यांचें सडेतोड वक्तव्य*

 *आदिवासी भूमिला पद्स्पर्श करणारे पहिलेच  लोकप्रतिनिधी  चंद्रकांत सोनवणे व कार्यसम्राट आमदार सौ लताताई सोनवणे यांचा दूरदृष्टी विकास डोळ्यात साठवून ठेवण्या जोगाच..* *वरगव्हाण व शेवरे येथील संरक्षण भिंतीचे काम प्रगतीपथावर..  सोडा भूलथापा..अन् सत्याला मापा...सरपंच भूषण पाटील यांचें सडेतोड  वक्तव्य* 


चोपडा (प्रतिनिधी): तालुक्यातील आदिवासी भागात आमदार सौ लताताई चंद्रकांत सोनवणे व कार्यसम्राट माजी आमदार चंद्रकांत अण्णासाहेब सोनवणे यांच्या  दिव्यदृष्टी संकल्पेतून विकास कामांची घोडदौड वायु वेगाने होत असून  गत काळात या आदिवासी भागात कोण्या लोकप्रतिनिधीचा  पायही या भूमिला लागलेला नव्हता..आता मात्र परिसराचे भाग्य खुलू लागले असल्याने जादुई नगरी सारखा क्षणार्धात लाखोंच्या कामांचा सोहळा पार पडत असल्याने आदिवासी बांधवांचा आनंद गगनाला भिडत आहे. नुकताच वरगव्हाण व शेवरे गावी प्रत्येकी १० लाखांची संरक्षण भिंतीचे काम जोमाने सुरू असल्याने दोन्ही. गावात भोगंऱ्यासम गुलाल उधळला जात आहे.


 चोपडा तालुक्यात गेल्या ३५ वर्षापासून निवडणूकांची चव चाखणाऱ्या  महोदयांना वरगव्हाण ,शेवरे यांसह अनेक आदिवासी पाडे ,वस्त्या ह्या निवडणुकीनंतर दिसल्या नाहीत.याऊपर पाहिले तर काहींनी "एसी"त निवडणुकीत गावाचं तोंड न पाहता या भूमिला पद्स्पर्शही  करण्याचे कष्ट घेतलेले नाहित. घरुनच लक्ष्मी मातेचे दर्शन देऊन आपला 'विजयी हात' उंचवण्याचे काम केले आहे .आता मात्र जनतेचा " राजा" जनतेचा सेवक म्हणून थेट आदिवासी भूमिला पद स्पर्श करीत  या ओस पडलेल्या भूमी मातेचा  उद्धारक अण्णासाहेब चंद्रकांत सोनवणे यांच्या रुपाने  मिळाल्याने चोपड्याचा नकाशा नव्या रुपात तयार होतो आहे.  वरगव्हाण व शेवरे गावाच्या विकासात मोठ्या प्रमाणात भर पडत आहे गेल्या काही दिवसांपूर्वी हायमास्ट दिव्यांच्या प्रकाशाने हा परिसर उजळून निघाल्यांनतर  रस्ते ,पाणी आदि समस्यांची निराकरण होऊन आता दोन्ही गावांच्या संरक्षण भिंतीचे २० लाखांचे काम प्रगतीपथावर आहे.

कर्तृत्वशाली माजी आमदारअण्णासाहेब चंद्रकांत  सोनवणे व आमदार सौ लताताई चंद्रकांत सोनवणे यांचे आभार दोन्ही गावांच्या गावकऱ्यांसह सरपंच श्री.भूषणभाऊ  पाटील, उपसरपंच निमा प्रताप बारेला,सपना वेरसिंग बारेला, जहांगीर मोहम्मद,प्रताप बारेला आदिंनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने