ग्रामसेवक "भाऊसाहेबांची" हिटलरशाही.. उमर्टी गाव विद्यूत पुरवठा खंडितने पाण्यावाचून आठ दिवसांपासून वंचित..अरे भर उन्हाळ्यात तहानेने मारणार काय? गावकऱ्यांचा तिखट सवाल..*

 

*ग्रामसेवक "भाऊसाहेबांची" हिटलरशाही.. उमर्टी गाव विद्यूत पुरवठा खंडितने पाण्यावाचून आठ दिवसांपासून वंचित..अरे भर उन्हाळ्यात तहानेने मारणार काय? गावकऱ्यांचा तिखट सवाल..*


चोपडा दि.२७(प्रतिनिधी): तालुक्यातील उमर्टी गाव आठ दिवस उलटूनही पाण्यापासून वंचित असल्याने ग्रामस्थांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे.त्याला  कारणही गंभीर असून ग्रामपंचायतींने १५ वित्त आयोगाच्या निधीतून वीज बील भरण्याची तरतूद केल्यावरही प्रशासक ग्रामसेवक  भाऊसाहेब आपल्या मिजास मध्ये वावरत आहे . आदिवासींना 'अक्कल शून्य' समजून आपले कोणीही काहीही वाकडे करू शकत नाही असं बोलत हिटलरशाही दाखवत वीज बील भरण्याची तसदी घेत नसल्याने भर उन्हाळ्यात वाटरसप्लायचा वीज पुरवठा खंडित आहे.परिणामी पाण्या वाचून गावकऱ्यांची त्राही त्राही होत असल्याने भयावह उद्रेक तोंड उघडू पाहत आहे.वरिष्ठ पातळीवर तक्रार करूनही कोणी दखल घेत नसल्याने अधिकारी "एसी"त बसून झोपा काढताय़ का? असा तिखट सवाल जनतेतून केला जात आहे.

उमर्टी  गूप ग्रामपंचायत सहा/आठ दिवसा पासुन पाणीपुरवठा बंद आहे तिन गावाच्या विज पुरवठा खंडित करणेत आला आहे गावकऱ्यांनी वारंवार तक्रार करुण देखील ग्रामसेवक दखल घेतली नाही त्यामुळे गावकऱ्यांनी बी डी ओं कडे पण तोडी समस्या माडल्या तेरी देखील ग्रामसेवक काही दखल नाही घेतली त्यामुळे गावात अशांतता निर्माण झाली आहे तरी वीज बील भरून पुरवठा सुरळीत न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा डॉ .जे .डी .सोनार  माजी संरपच राजु पावरा, माजी संरपच भीमसीग दादा प्रदेशी , माजी संरपच ईना पावरा ,बन्सी आप्पा व भरतसिंग प्रदेशी यांनी दिला आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने