चौगाव येथील श्री सुनील राजपूत जिल्हा परिषद कृषी विभागाकडून आदर्श शेतकरी पुरस्काराने सन्मानित---
चुंचाळेदि.३१( बातमीदार )ता. चोपडा चौगाव ता. चोपडा येथील प्रगतशील शेतकरी श्री सुनील धनसिंग राजपूत व सौ अनिता बाई राजपूत यांना जिल्हा परिषदेचा आदर्श शेतकरी पुरस्कार पंचायत समिती चोपडा येथील सभागृहात दिनांक 30/ 3 /2022 वार बुधवार सकाळी अकरा वाजता आदर्श शेतकरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. जळगाव जिल्हा परिषद तर्फे 2021/22 या वर्षाच्या महाराष्ट्र शासन जिल्हा परिषद कृषी विभागाकडून प्रगतशील शेतकऱ्यांना विशेष पुरस्कार देण्यात येतात या कार्यक्रमासाठी पंचायत समिती सभागृहात गटविकास अधिकारी भरत कोसोदे यांच्या हस्ते सत्कारमूर्तीना शाल श्रीफळ प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी उपस्थित कृषी विस्तार अधिकारी सतीश कोळी विस्तार अधिकारी योगिनी सोनवणे कृषी अधिकारी अशोक बावस्कर आणि तालुक्यातील शेतकरी बांधव उपस्थित होते.